रक्षाबंधनाच्या दिवशी पोलिसांच्या समजूतदारपणामुळे एका मुलीचा जीव वाचला आहे, त्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधील एका मुलीने रक्षाबंधनाच्या दिवशी इमारतीच्या टेरेसवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने एका पोलीस अधिकाऱ्याने तिला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे. ज्यामुळे पोलीस अधिकाऱ्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. कारण या पोलिसाने अतिशय हुशारीने या मुलीचा जीव वाचवला आहे. तर पोलीस अधिकाऱ्याने मुलीचा जीव कसा वाचवला आणि त्यांचे कौतुक का होतेय ते जाणून घेऊया.

रक्षाबंधनाच्या दिवशी एक मुलगी इमारतीच्या टेरेसवर आत्महत्या करण्यासाठी चढली होती. मुलीला टेरेसवर चढल्याचं पाहून उपस्थित लोक घाबरले होते. टेरेसच्या रेलिंगला उभी राहून मुलगी तिची नाराजी व्यक्त करत होती. यावेळी इमारतीखाली खूप लोक गोळा झाले होते. यावेळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, यावेळी एसीपी स्वतंत्र कुमार यांनी मुलीशी बोलून तिला आत्महत्या करण्यापासून रोखले.

हेही वाचा- Online मागवला मोबाईल, पार्सल उघडताच निघाला बॉम्ब; बॉम्बशोधक पथकाने घातला घराला घेराव, प्रकरण वाचून थक्क व्हाल

आत्महत्या करण्यासाठी तरुणी टेरेसवर चढली

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील न्याय खंड भागातील आहे. वडिलांवर नाराज झालेली दहावीत शिकणारी मुलगी टेरेसवर चढली आणि चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करु लागली. यावेळी ती रेलिंगवर उभी राहून आरडाओरडा करत असताना एसीपी स्वतंत्र कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीची समजूत काढून तिला आत्महत्या करण्यापासून रोखलं. मुलीशी बोलताना एसीपींनी तिला शांत केले आणि स्वत:ला आपण तिच्या भावासमान असल्याचे सांगितले. इतकंच नव्हे तर एसीपींनी मुलीला पाठिंबा देण्यांचही बोलणं यावेळी केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एसीपी मुलीशी बोलताना म्हणतात की, आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, मी तुझा भाऊ आहे, खाली ये आणि मला राखी बांध, मी तुला साथ देईन. एसीपींचे हे शब्द ऐकून मुलगी खाली उतरली आणि तिने स्वत:च्या समस्या त्यांना सांगितल्या.

हेही पाहा- भल्यामोठ्या बैलाला कारमधून फिरवणाऱ्या व्यक्तीचा VIDEO व्हायरल, बैलाला बसण्यासाठी केलेला जुगाड पाहून थक्क व्हाल

शिवाय एसीपीशी बोलल्यानंतर मुलीने आत्महत्येचा विचार सोडून दिला आणि ती टेरेसवरून खाली उतरली. मुलीच्या वडिलांनी तिला शिवीगाळ केल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं तर या मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे. वडिलांनी शिवीगाळ केल्यामुळे मुलगी अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या करण्याचं ठरवलं. मात्र, एसीपी स्वतंत्र कुमार यांनी ज्या प्रकारे समजूतदारपणा दाखवून मुलीचे प्राण वाचवले, त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.