Metro Girl Dirty Dance Video : मेट्रो ट्रेन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आतापर्यंत मेट्रोतील अनेक वादग्रस्त, आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात कधी कुणी अश्लील डान्स करताना, तर कधी कुणी जोडपे अश्लील चाळे करताना पाहायला मिळते. याचदरम्यान आता मेट्रोतील आणखी एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात ती पुरुष प्रवाशांसमोर अश्लील डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओवरून आता तरुणीला युजर्स प्रचंड ट्रोल करताना दिसतायत. तर, अनेक जण तिच्या मेट्रो प्रवासावर बंदी घालण्याची मागणी करीत आहेत.
अनेक जण रीलद्वारे प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारचे डान्स करीत अश्लीलतेचा कळस गाठताना दिसतात. व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील असल्याचे सांगितले जात आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धावत्या मेट्रो कोचमध्ये एक तरुणी आनंदाने नाचताना दिसत आहे. यावेळी तिने क्रॉप टॉप आणि पँट असे कपडे घातले आहेत. आजूबाजूला सर्व पुरुष प्रवासी बसले असतानाही ती बिनधास्त नाचताना दिसत आहे. यावेळी ती मधे मधे अश्लील स्टेप करताना दिसत आहे. पोल डान्स करण्याचाही ती प्रयत्न करतेय. तिच्या एकूणच स्टाईलकडे पाहून असे वाटते की, ती प्रवास करण्यासाठी नाही, तर फक्त नाचण्यासाठीच मेट्रोमध्ये आली आहे. यावेळी प्रवाशांमधील काही लोक तिच्या डान्सचा आनंद घेत होते. तर काही जण तिचा व्हिडीओ शूट करत होते. त्यात काहींनी तिच्याकडे बघणंही टाळलं.
हा व्हिडीओ @ranjeetraiderr15 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आजकाल लोक लाइक्स आणि व्ह्युजसाठी काहीही करीत आहेत. तर दुसऱ्याने लिहिले की, या तरुणीला मेट्रोमधून प्रवास करण्यास बंदी घालावी. तिसऱ्याने लिहिले की, आजकाल लोक मेट्रोमध्ये प्रवास करायला येत नाहीत.