Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आताही दिल्ली मेट्रेमधील एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुली काहीतरी हटके करायला गेल्या आणि तो जर त्यांचा प्रयत्न फसला तर नेटकरी मुलींची चांगलीच थट्टा करतात. पापा की परी म्हणून चिडवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील मुलींनाही नोटकऱ्यांनी पापा की परी असं नाव दिलंय. त्याला कारणही तसंच आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी मेट्रोमध्ये उभी असलेली दिसत आहे. ती एकटीच उभी नाहीये तर तीनं मेट्रोमध्ये चक्क सायक आणली आहे. या मुलीला पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सामान्यत: अशा प्रकारे मेट्रोमध्ये सायकल आणण्यास परवानगी नाही. अशा स्थितीत मुलीने मेट्रोमध्ये सायकल कशी आणली?, हा विचार करून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तरुणीचा मेट्रोमध्ये सायकलसह प्रवास पाहणे फारच रंजक आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबई: भाईंदरमध्ये रेल्वे येताच फूटओव्हर ब्रिजवरुन रुळावर मारली उडी अन्..; थराराक VIDEO व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @terakyalenadena नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘भाऊ, तिने मेट्रोमध्ये सायकल कशी घेतली, तिला सायकल घेण्याची परवानगी आहे का? एवढी तपासणी करूनही हे कसे शक्य आहे? दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘पापा की परी काहीही करू शकते.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तिने स्कूटर आणली असती तर…’

तुम्हाला करता येईल का सायकलसह मेट्रोमध्ये प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीच असा प्रश्न पडला असणार की दिल्ली मेट्रोमध्ये सायकलसह प्रवास करण्याची परावनगी आहे का? तर उत्तर आहे होय. तुम्ही सायकलसह मेट्रोमध्ये प्रवास करु शकता. दिल्ली मेट्रोमध्ये सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे मात्र दिल्ली मेट्रो सायकल चालविण्यास परवानगी देते, परंतु केवळ विशिष्ट मार्गांवर आणि विशिष्ट वेळी