Mumbai local bhayandar video: आजची तरुण पिढी काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आत्महत्या करत असल्याचे दिसतंय. मात्र, मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दल आणि पश्चिम रेल्वेच्या सतर्क जवानांनी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय.
पश्चिम रेल्वेने सांगितले की आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली होती. दरम्यान एका आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आणि पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्याला रेल्वे रुळांवरून बाजूला आढले, त्यामुळे तो ट्रेनखाली जाण्यापासून वाचला. व्हिडिओमध्ये भाईंदर रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावरील पुलावरून एक व्यक्ती उडी मारताना दिसत आहे. उडी मारल्यानंतर त्याला दुखापत झाली असल्याचं दिसत आहे, उंचावरुन उडी मारल्यामुळे त्याला रेल्वे रुळावरुन उठताही येत नाहीये. यावेळी ट्रेन येण्याआधी एक आरपीएफ कर्मचारी आणि पश्चिम रेल्वेचे कर्मचारी त्या तरुणाकडे धावतात आणि त्याला रेल्वे रुळांवरून बाहेर काढतात. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचला नाहीतर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला असता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् घरच्यांना सापडला…मुलीच्या घरच्यांनी थेट विषयच संपवला; VIDEO व्हायरल
यानंतर तरुणाला मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबीयांन आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे,” असे पश्चिम रेल्वेने सांगितले. मात्र तरुणानं रेल्वे रुळावर कशामुळे उडी मारली हे अद्याप कळू शकले नाही. ही घटना प्रत्यक्षात कधी घडली हे देखील स्पष्ट झालेले नाही.हा व्हिडिओ Western Railway या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.