आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या रिल्सने पछाडले आहे. यात अनेकजण डान्स रिल पोस्ट करुन लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र रिलसाठी काहीतरी वेगळ करण्याच्या नादात लोक काहीवेळा असे काही करतात ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल. अशाचप्रकारे एक तरुणी रिलसाठी चक्क सिलिंडरवर चढते आणि आनंदाने नाचू लागते. मात्र यानंतर तिच्याबरोबर असे काही घडते जे पाहून तुम्हालाही हसू येईल. तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी गॅस सिलिंडरवर उभी राहते आणि कंबर वाकलून नाचतेय. कधी एका पायावर बॅलेन्स करत तर कधी हात हवेत उंचावत ही तरुणी नाचतेय. रिलसाठी तरुणी धोकादायक पद्धतीने सिलिंडरवर उभी राहून अगदी जोशात नाचत असते. मात्र नाचता- नाचता पुढच्याच क्षणी तिचा तोल जातो आणि ती जोरात सिलिंडरवरुन खाली कोसळते. ती ज्याप्रकारे खाली कोसळते ते पाहता तिच्या पाठ आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली असेल, असा अंदाज आहे.

३१ मे पंचांग: महिन्याचा शेवटचा शुक्रवार, मेष ते मीन राशीला कसा जाईल? तुमच्यावरही होईल का देवी लक्ष्मीची कृपा? वाचा तुमचे राशीभविष्य

हा व्हिडीओ @arvindchotia नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “अरेरे, हा रिलचा नाद अन् फुकटचा त्रास….” हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला, ज्यावर शेकडो लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी हास्यास्पद कमेंट करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत, तर काहींनी रिल्सचा नाद कसा भारी पडला असे म्हणत मिश्लिक टिपण्णी केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! हातातील मोबाइल हिसकावल्याने पत्नीचा संताप, पतीला पलंगाला बांधून दिला विजेचा शॉक, मुलालाही केली मारहाण

एका युजरने लिहिले की, रिलचे भूत चांगल्याप्रकारे उतरले. दुसऱ्या युजरने लिहिले की, म्हणून सरकार सिलिंडरचे भाव वाढवत आहे, तिसऱ्या युजरने म्हटले की, खूप चांगल झालं, या व्हायरसवर हेच औषध आहे.