आई-वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताचं मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी करू शकत नाही. आई वडिल आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, प्रसंगी स्वत: उपाशी राहतात मात्र मुलांना काही कमी पडू देत नाहीत. मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वप्न पाहतात. लेक ही वडिलांच्या आणि भावाच्या काळजाचा तुकडा असते, लहानपणापासून वडिल लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात. मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर कुटुंबाच्या विरोधात जात असेल तर, कोणत्याही वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळेल. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून जात आहे.यावेळी मुलगी तिच्या प्रियकरासोबत बस स्टॉपवर पोहोचताच तिचा भाऊ तिथे येतो. आणि पुढे जे होतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

प्रियकरासोबत पळून जाताना भावानं पकडलं

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बस स्टॉपचे दृश्य दिसत आहे. जिथे एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवर बसले आहेत आणि एक मुलगा उभा राहून त्यांच्याशी वाद घालताना दिसत आहे. बाईकवर बसलेले मुलगा आणि मुलगी हे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जातंय. तर जो मुलगा उभा राहून त्यांच्याशी वाद घालतो तो मुलीचा भाऊ आहे. मुलगी प्रियकरासह घरातून पळून जात आहे. यासाठी मुलगी आणि तिचा प्रियकर बस स्टॉपपर्यंत पोहोचतात. पण तेवढ्यात मुलीचा भाऊ तिथे पोहोचतो. आणि दोघांनाही पकडतो. यानंतर तो दोघांवरही हात उचलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> समुद्रातील झोक्यावर उभी राहून डान्स करत होती तरुणी; पाय घसरला अन्…अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रेमप्रकरण मध्य प्रदेशातील रेवा येथील असल्याचे सांगितले जात आहे. भावाने मुलीला पकडल्यानंतर ती प्रियकरासह पोलिस ठाण्यात गेली. जिथे पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र मुलगी प्रियकरासोबत राहण्यावर ठाम होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, दोघेही प्रौढ आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्ण घेण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही घटना घडत असतात.