Viral video: प्रेमात पडल्यावर लोक सर्व काही विसरतात. काय योग्य आणि काय अयोग्य, त्यांच्या प्रेमापुढे सगळेच फिके पडू लागते. पूर्वीच्या काळी लोक आंतरजातीय विवाहाला अवघड समजत असत. घरातील सदस्यांविरुद्ध बंड करून घरातून पळून जाणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असायचा. पण आजच्या काळात आंतरजातीय विवाहाबरोबरच समलिंगी विवाहाचाही कल वाढला आहे. म्हणजेच आता मुलं मुलांसोबत डेट करतात तर मुलीही मुलींसोबत डेट करतात.
प्रेमात सुरुवातीला सर्वकाही चांगले वाटते. आपल्या प्रेमासाठी, प्रियकर, प्रेयसीसाठी काहीही करायला तयार असतात. लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बंड करतात आणि आपल्या जोडीदारासह पळून जातात. पण जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत राहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे कळते. यानंतर खरा त्रास सुरू होतो. सोशल मीडियावर एका मुलीने तिच्या लव्ह स्टोरीचा धरक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिने तिच्या मैत्रीणीशी लग्न करण्यासाठी तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन घर सोडले, मात्र आता तीच तिला हवं तेव्हा मारते, त्रास देते.
कधी गळा दाबायची तर कधी…
हे प्रकरण मलेशियाचे असून येथे राहणाऱ्या एका मुलीने तिच्या लव्ह स्टोरीची खरी बाजू लोकांसमोर आणली आहे. तिची जोडीदारीन तिला कशी मारहाण करते हे तिने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं या गैरवर्तनाचा व्हिडिओ बनवला आणि तो ट्विटरवर शेअर केला. यामध्ये दोघीही बसून बोलताना दिसत आहेत, दरम्यान अचानक एक मुलगी आक्रमक होते आणि काठीने समोरच्या मुलीला मारु लागते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral: आई मनाचा ‘बाप’माणूस! लेकीच्या शाळेत आई बनून पोहचले वडिल; पाहताच लेकीला अश्रू अनावर…
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला. तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी लगेच मुलीला तिच्या जोडीदारावर गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. तसेच हे नाते ताबडतोब संपवावे असेही सांगितले. आज ती मारतेय, उद्या प्रकरण आणखी वाढू शकते, त्यामुळे लवकरात लवकर तिच्यापासून लांब जा असा सल्ला नेटकरी देत आहेत.