वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील | Loksatta

वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील

मोठ्या बहिणीला घरी परतल्यानंतर धाकट्या बहिणीने काय केलं ते पाहतच राहाल…

वेड्या बहिणीची वेडी माया! धाकट्या बहिणीला पाहून मोठ्या बहिणीनं काय केलं पाहा? Viral Video पाहून आनंदाश्रू तरळतील
मोठ्या बहिणीला पाहिल्यानंतर धकट्या बहिणीने असं काही केलं…(image-social media)

कुटुंबात असणारी माणसं आपल्यापासून दुरावली की काळीज धडधडायला लागतं. सख्खा भाऊ, बहिण, आई-वडील, पती-पत्नी असो वा मित्रमंडळी यांच्यासोबत हृदयाला स्पर्श करणारे नातेसंबंध असतात. त्यातच कुणी लाडका असेल, तर त्याच्याशिवाय राहणं कठीणंच. कारण अशाच प्रकारचा दोन बहिणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बहिणींना या व्हिडीओत पाहिल्यावर ‘वेड्या बहिणीची वेडी माया’ अशीच भावना निर्माण होईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या बहिणींचा जिव्हाळा पाहून तुमचे आनंदाश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत.

नेमकं काय घडलं?

कुटुंबात असणारे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना हसत खेळत राहताना, मस्ती करताना तसेच भांडण करताना नेहमी पाहतात. पण भाऊ-बहिणीचं नातं असेल, दोन बहिणींमधील जिव्हाळा असेल, तो घरातील अनेक माणसांना त्यांच्या वागणुकीतून दिसून येतो. परंतु, त्यांच्यातील असलेला एकोपा काही कारणास्तव कमी झाला किंवा कुणी घरातून बाहेरगावी गेलं की, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी माणसंही आपण पाहतो. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सहा महिन्यानंतर मोठ्या बहिणीला घरी परत आल्याचं पाहिल्यानंतर धाकट्या बहिणीच्या प्रेमाचा अंकुर फुटला. गेल्या सहा महिन्यांपासून छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीली मिस केलं. मोठी बहिण समोर आल्यानंतर दोघींनीही एकमेकांना मिठीत घेत पुन्हा एकदा त्यांच्यातील असलेल्या प्रेमाची गाठ घट्ट केली.

नक्की वाचा – “पतली कमरीया मोरे हाय हाय”, चक्क स्पोर्ट्स बाईकवर उभं राहून तरुणीचा भन्नाट डान्स , तरुणांनाही वेड लावलं, Video होतोय Viral

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हर्जीनीया का वुल्फ या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. मोठी बहिण धाकट्या बहिणीला भेटण्यासाठी रुमचा दरवाजा उघडते आणि तिला सरप्राईज देते. त्यावेळी छोटी बहिण अभ्यास करत असते. पण लाडक्या बहिणीला घरी परत आलेली पाहिल्यानंतर ती तिच्या खांद्यावर उडी मारते आणि तिला मिठीत घेते. हे दृष्य पाहून नेटकऱ्यांनाही नात्यातील जिव्हाळा कसा असतो, याचा प्रत्यय मिळाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास २ लाख व्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी भावनिक कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 19:12 IST
Next Story
कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?