सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे व्हिडीओ पाहिले असेल. दरम्यान गर्लफ्रेंड आणि तिचे नखरे हा सोशल मिडियावर नेहमीच एक चर्चेचा आणि विनोदाचा भाग असतो. बॉयफ्रेंड समोर गर्लफ्रेंडचा नखरा स्वाभाविक आहे. मात्र हा नखरा काही वेळा महागात पडतो. अशातच एका नखरेल गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तिला जास्त नखरा करणे महागात पडले अन् सर्वांसमोर तिची फजिती झाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या जिकडे तिकडे पाऊस पडतोय. त्यामुळे सगळीकडे पानी साचलयं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुसळधार पाऊस होऊन गेल्याने रस्त्यावर भरपूर पाणी साचलं आहे. या पाण्यात एका तरुणाची दुचाकी फसली आहे आणि ती बंद पडली आहे. त्याची मैत्रीणही त्याच्यासोबतच आहे. पण खाली पाणी असल्याने या मॅडम काही गाडीवरून उतरायला तयार नाहीत. तो बिचारा गाडीची किक मारून मारून परेशान आहे. पण गाडी काही सुरू होईना आणि मैत्रिण काही खाली उतरेना.
पुढच्याच क्षणी झाला ‘पोपट’
शेवटी मग बिचारा थकून गेला. आणि त्याच नादात त्याचा गाडीवरचा ताबाही सुटला. मग काय गाडी पडली आणि गाडीवर बसलेली त्याची गर्लफ्रेंड धाडकन पाण्यात कोसळली.
पाहा व्हिडीओ
या मजेशीर व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींच्या मते या मुलाने मुद्दाम गाडीवरचा हात सोडला. काहींच्या मते गर्लफ्रेंडचे नखऱ्यांना बघून वैतागून असं केलं.