Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणींच्या गृपच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत
डोकं कसं तडतड तडतड… गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोकं कसं तडतड तडतड… हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण पाच तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. एका लाईनमध्ये या तरुणी थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ step_art_entertainment नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय अशी प्रतिक्रिया दिलीय.