scorecardresearch

VIRAL VIDEO : सांगा या व्हिडीओमधली बकरी भिंतीवर हवेत उडून गेली की चढून गेली ? अनेकजण गेले गोंधळून

हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच चक्रावून गेले आहेत. ही बकरी नक्की भिंतीवर चढून गेली की उडून गेली हेच लोकांना ठरवता येत नाहीय.

Goat-Video-Viral
(Photo: Twitter/ Dipanshu Kabra)

अनेकदा असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्याला पाहून लोक हैराण होतात. लोकांना सुद्धा गोंधळात टाकणारे व्हिडीओ पहायला फार आवडतात. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास होत नाहीय. हा व्हायरल व्हिडीओ एका बकरीचा आहे. आपली डोळ्याची पापणी लवण्याच्या आत ही बकरी खालून वर भिंतीवर पोहोचलेली दिसून येते. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच चक्रावून गेले आहेत. ही बकरी नक्की भिंतीवर चढून गेली की उडून गेली हेच लोकांना ठरवता येत नाहीय. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलीय.

सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘ज्यांच्यामध्ये पुढे जाण्याची जिद्द असते त्यांना परिस्थिती सुद्धा कधी रोखू शकत नाही’ असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इतकी उंच भिंतीवर ही बकरी काही सेकंदातवर पोहोचलेली असते. इतक्या सहज आणि झटपट या बकरीला भिंतीवर पाहून सारेच जण हैराण झाले आहेत.

आणखी वाचा : रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, VIRAL VIDEO मध्ये असं काय आहे ज्याने साऱ्यांनाच वेड लावलंय

या व्हिडीओमध्ये बकरी ज्या पद्धतीने भिंतीवर जाते ते पाहून असं वाटतं की बकरी भिंतीवर चढून गेली. पण इतक्या कमी वेळेत ही बकरी भिंतीवर चढून नाही उडूनच गेली असावी, असा देखील अंदाज लोक बांधताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमधल्या बकरीचं टॅलेंट लोकांना खूपच आवडू लागलंय. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहून शोधत आहेत की ही बकरी भिंतीवर चढून गेली की उडून गेली ? परंतू वारंवार व्हिडीओ पाहून सुद्धा लोकांना याचं उत्तर मिळणं अवघड झालंय.

आणखी वाचा : OMG! भल्यामोठ्या भिंतीवर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून घरचेच काय तुम्हीही हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा सिंहाचा छावा मांजरीच्या आवाजात गर्जना काढू लागतो…,पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४७.६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आपआपली मत व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goat climbs on a high wall flying in the air internet shocked to see this watch viral video prp

ताज्या बातम्या