पंजाबला लागून असलेल्या पठाणकोटजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथून निघालेली मालगाडी अचानक 100 किमी वेगाने रुळावरून धावू लागली. आश्चर्याची बाब म्हणजे या मालगाडीमध्ये त्यावेळी लोको पायलट नव्हता. म्हणजेच मालगाडी चालकाशिवाय रुळांवरून धावत होती. खूप प्रयत्नांनंतर अखेर या मालगाडीला रोखण्यात यश आले. चालकाशिवाय धावणाऱ्या मालगाडीबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी स्थानकावर घोषणा करून ट्रॅक रिकामे करण्याचे आवाहन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या दसूया येथील उन्ची बस्सीजवळ येथे वीजपुरवठा खंडित करून रेल्वे थांबवण्यात आल्याचे कळताच रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

एएनआय यवृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, पंजाबमधील पठाणकोटच्या दिशेने असलेल्या नैसर्गिक उतारामुळे मालगाडी चालकाशिवाय धावू लागली.. जम्मूच्या विभागीय वाहतूक व्यवस्थापकाने या घटनेची चौकशी सुरू केल्याची पुष्टी केली.

हेही वाचा – कर्माचे फळ! हत्तीला काठीने हुसकावणे व्यक्तीला पडले महागात; हत्तीने कशी घडवली त्याला अद्दल, पाहा Video

एएनआय या वृत्तसंस्थेने उची बस्सीजवळ ट्रेन थांबवल्यानंतर त्याचे फुटेज शेअर केले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त मिळाले नाही. ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करणारी ही ट्रेन आपत्कालीन ब्रेक वापरून थांबवण्यात आली.या मार्गावरील सर्व रेल्वे क्रॉसिंग रस्त्यावरील वाहतुक तात्काळ बंद करण्यात आली आणि ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी काही यांत्रिक पद्धती वापरण्यात आल्या, असे रेल्वे पोलिस एएसआय गुरदेव सिंग यांनी हिंदुस्थान टाईम्सला माहिती देताना सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फिरोजपूर रेल्वे विभागातून अधिकारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चालकाशिवाय मालगाडी धावू लागली, प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली

ही मालगाडी कठुआ रेल्वे स्टेशनवर एका उतारावर उभी होती, जी स्वतःहून पुढे जाऊ लागली. तेव्हाच कठुआ रेल्वे स्थानक प्रशासनाला कळले की, ही ट्रेन रेड सिग्नलशिवाय निघून गेली. ही ट्रेन कठुआ रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका मोकळ्या रुळावरून ती धावू लागली. त्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ जालंधरपर्यंतचा संपूर्ण रेल्वेचा संपूर्ण मार्ग मोकळा केला. ५३ डबे असलेली ही ट्रेन दगडांनी भरलेली होती.

कठुआ येथून निघाली उची बस्ती येथे जाऊन थांबली

कठुआ लाइन क्रमांक ३ वरून रविवारी सकाळी ७.१३ वाजता मालगाडी निघाली, ती मधुपूर पंजाब रेल्वे स्थानकातून सकाळी ७.२४ वाजता सुटली, ती सुजानपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.३० वाजता गेली, त्यानंतर ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. सकाळी ७:३३ वाजता भरौली रेल्वे स्थानकावर पोहोचली. ७:३६ वाजता पठाणकोट रेल्वे स्थानकावरून पार करून, ७:४७ वाजता कंधोरी रेल्वे स्थानकावर पोहोचली आणि नंतर ८:३७ वाजता उंची बस्सी येथे थांबली.

१०० किमी/तास वेगाने धावणारी मालगाडी अशाप्रकारे बंद पडली.

फिरोजपूर विभागाचे एडीआरएम जेएस गुलेरिया यांनी एनडीटिव्हीला माहिती देताना सांगितले की, मालगाडी थांबवण्यात आली आहे. जालंधरजवळील उची बस्सी गावाजवळ चढ असल्याने भरधाव वेगाने धावणारी ट्रेन स्वतःहून थांबली. “मालगाडी कठुआ येथून चालकाशिवाय सुरू झाली होती आणि सुमारे ७० किलोमीटरचे अंतर कापून उची बस्ती येथे पोहोचली होती.

हेही वाचा – जेव्हा झोमॅटोही ‘छपाक’ खेळ खेळतो तेव्हा…; ग्राहकाने ‘फिश फ्राय’ मागवताच, म्हणाले, “पानी में गई”; Chat व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका रेल्वे ट्रॅकवर चालकविना धावणारी मालवाहू ट्रेन, नैसर्गिक उताराने चाललेली आणि उच्च वेगाने पोहोचते. ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करणारी ही ट्रेन आपत्कालीन ब्रेक वापरून थांबवण्यात आली.

या मार्गावरील सर्व रेल्वे क्रॉसिंग रस्त्यावरील वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आली आणि ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी काही यांत्रिक पद्धती वापरण्यात आल्या, असे रेल्वे पोलिस एएसआय गुरदेव सिंग यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फिरोजपूर रेल्वे विभागातून अधिकारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.