भारतीय जवानांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. जवान प्राणाची बाजी लावून देशासाठी सीमेवर लढत असतात. त्यामुळे देशातील नागरिकांचं त्यांच्याशी भावनिक नातं आहे. २६ जानेवारीच्या परेडची सध्या रंगीत तालिम सुरु आहे. या तालिमेतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडीओत गोरखा रायफल्स रेजीमेंटचा एक जवान कुकरीसोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच इतर जवान टाळ्या वाजवताना दिसत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच हजारांच्या आसपास लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर पाचशेहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी लिहिले, “गोरखा जवानाचा कुकरी डान्स. गोरखा सैनिकांसाठी असे म्हटले जाते की, ते एकदा मैदानात उतरले की, शेवट केल्यानंतरच परततात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, “कुकरीसोबत डान्सही करता येतो, वाह क्या बात है”. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ म्हणायचे, जर कुणी म्हणत असेल की, त्याला मृत्यूची भीती वाटत नाही, तर तो खोटे बोलत आहे किंवा तो गोरखा आहे.’ एरवी असेच चेष्टामस्करी करणारे गोरखे जेव्हा अंगावर लष्करी गणवेश चढवतात आणि ‘जय महाकाली, आयो गोरखाली’ असा जयघोष करत म्यानातून कुकरी (नेपाळी भाषेत खुकुरी) बाहेर काढून रणांगणात उतरतात तेव्हा ते जगातील सर्वात घातक योद्धे बनलेले असतात. अडचणीच्या काळात जेव्हा अन्य सैनिक किंवा रेजिमेंट्स एखादे ठाणे सर करण्यात असफल ठरतात, तेव्हा विजयश्री खेचून आणण्यासाठी सेनानींच्या ओठांवर एकच आज्ञा येते, ‘सेंड इन द गोरखाज!’ आणि गोरखा योद्धय़ांनी ही ख्याती प्रत्येक वेळी प्राणपणाने जपली आहे.