Dance Video: अलीकडे आपल्याला सोशल मीडियामुळे वारंवार वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओत कपल डान्स तर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लग्नाच्या कार्यक्रमातील डान्स असतील तर कधी गावाकडील काही कार्यक्रमातील डान्स सोशल मीडियावर पोस्ट होतात. या व्हिडिओत वयस्कर लोकांचाही समावेश असतो.वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे सगळेच शॉक झाले आहेत.

अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये एका आजींनं आपल्या भन्नाट डान्स केलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक आजी साडी नेसलेली दिसत आहे. आजीने मस्त असा चष्मा घातला आहे. तसेच डोक्याला टॉवेलती पगडी बांधली आहे. यानंतर आजी भन्नाट अशा स्टेप्स करत डान्स करत आहेत. त्यांच्या एक वेगळाच स्वॅग दिसून येत आहे. सध्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याची माहिती नाही. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Gedila Sekhar (@gsekhar75)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर gsekhar75 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय, “”आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही स्वतःच्या थाटात जगायचं”” अशी कमेंट केली आहे.