हिंदू धर्मात गंगा स्नानाला खूप महत्व आहे. याने आपल्या चूकीचे प्रायश्चित्त मिळतं, असं मानलं जाचं. तसंच पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण गंगेत स्नान करणे शुभ मानतात. सध्या ऋषिकेश-हरिद्वारमध्ये हजारो भाविक जमले असून या ठिकाणी जणू जत्राच भरलीय. एका ७० वर्षांच्या आजीनेही गंगेत स्नान करण्यासाठी उडी घेतली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध महिला गंगेच्या पुलावरून उडी घेत आहे. उडी मारल्यानंतर गंगा नदीत पोहायला लागते. गंगा नदीत उडी घेत तिने गंगास्नान केलं. याचा व्हिडीओ पाहून काही जणांना यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. जिथून भले स्टंटमन आणि जलतरणपटू उडी घेण्यासाठी घाम गाळतात, तिथून ही आजी स्टंटबाजी करताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. इतकंच नाही तर ती आजी सहज गंगेत उडी मारते आणि पोहते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका कागदाच्या मदतीने आईने लेकीला शिकवला आयुष्यातला ‘हा’ महत्त्वाचा धडा

हा व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ गौरव शर्मा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरूवात केली आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत ७० वर्षीय आजींच्या या साहसाबद्दल कौतुक करत आहेत. स्नेह गहल्यान नावाच्या युजरने लिहिले की, “या वयात क्वचितच चालता येत असेल. पण, आजीने स्वतः पुलावरून उडी मारून गंगेत स्नान केले. वयाच्या ७० व्या वर्षी असे स्टंट करण्याचा विचारही करत नाहीत. पण हे या आजींनी शक्य करून दाखवलंय.”

आणखी वाचा : कॅनडामध्ये आलेल्या SuperCell वादळाचा VIDEO VIRAL, थरारक दृश्य टाइमलॅप्स मोडमध्ये कॅप्चर

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : डोक्यावर सुटकेस ठेवून या माणसाने चक्क सायकल चालवली, बॅलन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रकरण आता पोलिसांपर्यंतही पोहोचले आहे. हरिद्वारच्या एसएसपींनी आजीच्या गंगेत उडी मारल्याप्रकरणी तपास सुरू केल्याचे वृत्त आहे. हरिद्वारचे एसएसपी योगेंद्र रावत म्हणाले की, असे करणे योग्य नाही. वृद्धांच्ं पुलावरून गंगेत उडी मारणे कायद्याने गुन्हा आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. त्यावेळी गंगेच्या पुलावर कोणता पोलीस कर्मचारी ड्युटीवर होता, याचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात हर की पैडी चौकीकडून अहवाल मागवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.