वाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच! दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. ऋतू कोणताही असो, चहाची मागणी नेहमीच असते. चहा हे भारताचे आवडते पेय मानले जाते. चहाच्या घोटासाठी लोक कुठेही पोहोचत नाहीत. दिवसाची सुरुवात असो किंवा रात्रीची वेळ असो, भारतीयांना नेहमी चहा प्यायला आवडते. मात्र आता तुम्हाला कुणी स्माशानभूमीत चहासाठी येण्याची ऑफर दिली तर? गोंधळलात ना..पण हे खरं आहे. स्मशानभूमी अनेकांना या ठिकाणी गेल्यावर अस्वस्थता जाणवते. मात्र एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीच्या जमिनीवर चहाचं दुकान सुरु केलं. एवढंच नाही तर लोक मेलेल्या लोकांभोवती बसून अन्नदेखील खातात. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

हे रेस्टॉरंट अहमदाबादमधील आहे.रेस्टॉरंटचे मालक कृष्णन कुट्टी यांनी अहमदाबादमध्ये ही जमीन विकत घेतली होती, परंतु हे स्मशान आहे याची त्यांना माहिती नव्हती. मात्र, जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हाही त्यांनी आपली जागा बदलली नाही. रेस्टॉरंट बांधण्याची योजना आखली. कबरींना स्पर्श न करता, कबरींभोवती लोखंडी सळया लावण्याशिवाय, त्यांच्या मालकाने उपलब्ध जागेत कबरीभोवती बसण्याची जागा बनवली आहे. आजही हे हॉटेल सुरु आहे. या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तर नेटकरीही भरपूर प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – रडणाऱ्या शेतकऱ्याचं गाईनं असं केलं सांत्वन, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @hungrycruisers नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पुढे सांगितलं की, दररोज सकाळी, कर्मचारी सर्व कबरी साफ करतात आणि त्यांना ताज्या फुलांनी सजवतात. हे ठिकाण हळूहळू लोकप्रिय होत गेलं आणि शहरातील सर्वात पसंतीच्या ठिकाणांपैकी एक बनले. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, “जसे तुम्ही जिवंत लोकांचा आदर करता तसे मृतांचा आदर करा.”