Groom bride dance video: लग्न म्हटलं की सगळीकडे धामधूम सुरु असते. भारतात लग्न म्हणजे एखादा सणच असतो. लग्नात इतक्या विधी आणि परंपरा असतात की नवरा-नवरी अक्षरश: हैराण होतात.लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. आयुष्यातल्या या खास दिवशी नवरा आणि नवरी स्टेजवर डान्स परफॉर्म करत हा दिवस साजरा करण्याचा हल्ली ट्रेंडच आलाय. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर आपलं प्रेम व्यक्त करणं पसंत करत असतात. सोशल मीडियाच्या जगात असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.

लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरा नवरीनं आपल्या हळदीला मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरी आपल्याच हळदीच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स करत आहेत. यावेळी नवरी-नवरदेवाच्या डान्स मूव्हज् पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. हळदीच्या कार्यक्रमात डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी दोघेही खूप आकर्षक दिसत आहेत. नवरदेव आणि नवरीने सेम रंगाचे कपडे घातले आहेत. नवरा नवरी हा डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ amol.kharat.7140497 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे. एकानं म्हंटलंय, नवरदेवापेक्षा नवरी खूश दिसतेय कारण तिला मनासारखा नवरा भेटलाय, तर आणखी एकानं, एक नंबर डान्स अशी प्रतिक्रिया दिली आहे.