Viral video: लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा नवरीने आपल्या लग्नाच्या वरातीत तुफान डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, वरात या दोघांनीच गाजवली आहे.

लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “कामावर जायला उशीर झायला. कामावर जायला उशीर झायला. बघतोय रिक्षावाला गं. वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्यावर नवरदेव आणि नवरीनं आपल्याच वरातीत भन्नाट डान्स केला आहे. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे.डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. 

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ insta_trending_kings नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जाळ अन् धुर संगटच” तर दुसऱ्या एकानं, स्वत:चंच लग्न गाजवलं दोघांनी, तर आणखी एकानं “मलाही अशीच बिन्धास्त नाचणारी बायको पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे