Viral video: लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका कपल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरा-नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरा नवरीने आपल्याच लग्नात तुफान डान्स केला आहे.
लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता, संपूर्ण लग्नाचा हॉल पाहुण्यांनी भरलेला आहे. याच पाहुण्यांसमोर नवरा-नवरीनं हलगीच्या तालावर ठेका धरत जबरदस्त असा डान्स केला आहे. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी संभळीवर नवरा-नवरी लग्नात थिरकली आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओmarathi_royal_karbhar नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जाळ अन् धुर संगटच” तर दुसऱ्या एकानं, स्वत:चंच लग्न गाजवलं दोघांनी, तर आणखी एकानं “मलाही अशीच बिन्धास्त नाचणारी बायको पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.