सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वधू-वरांचे किस्से तर कधी लग्नातील डान्स व्हिडीओ चर्चेत असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
या व्हिडीओत नवरदेव नवरीसोबत नाही तर नवरीच्या आईसोबत म्हणजेच सासूसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video: मगर निघाली शाळेला! काही क्षणातच रेस्क्यू टीमनं धाडलं जंगलात, थरारक दृश्य व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका स्टेजवर नवरदेव डान्स करत आहे आणि नवरीसुद्धा नवरदेवासोबत डान्स करताना दिसत आहे. इतक्यात अचानक स्टेजवर नवरीची आई येते आणि त्यांच्यासोबत डान्स करायला सुरुवात करते.
व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसते की नवरदेव सासूसोबत बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. सासू-जावयाची ही डान्स जोडी नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. सासूबाईने चेहऱ्यावर ‘घुंघट’ घेतला आहे त्यामुळे सासूबाईचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाही.

हेही वाचा : कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली ‘ही’ कला; मुक्या जीवाचं प्रेम पाहून डोळे भरून येतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरदेव आणि त्याच्या सासूचा डान्स करतानाचा उत्साह विशेष लक्ष वेधून घेणारा होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
bridal_lehenga_designn या इन्स्टाग्राम अकांउटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.