Groom dances in haladi Viral Video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण. या महत्त्वाच्या क्षणी दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंबाचंही मिलन होतं. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भारतात लग्नसंस्थेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे साखरपुड्यापासून, हळद आणि लग्नापर्यंत हा सोहळा अगदी धुमधक्याडात पार पडतो.

शहरातील मोठ-मोठ्या लग्नसमारंभापेक्षा गावातील लग्नसमारंभ वेगळे असतात. प्रत्येक गावी लग्नाच्या आपआपल्या वेगळ्या प्रथा असतात. त्या प्रथेनुसार लग्नसोहळा पार पडतो. सोशल मीडियावर अशा लग्नसोहळ्यांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात नवरदेव त्याच्या हळदीत एकदम हटके स्टाईलमध्ये डान्स करत आहे.

हेही वाचा… माझ्याशी लग्न कराल का? ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने शिक्षिकेला घातली लग्नाची मागणी; VIRAL VIDEO एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या तुफान गाजतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरदेव त्याची हळद चांगलीच एन्जॉय करताना दिसतोय. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत नवरदेव गाण्यावर थिरकताना दिसतोय. नवरदेवासह त्याचा ठेका मॅच करत बाकीची पुरुष मंडळीदेखील त्याच्या मागे डान्स करताना दिसत आहेत. सफेद सदरा लेंगा, डोक्याला बाशिंग आणि हळदीने माखलेला नवरदेव अगदी जोशात त्याची हळद गाजवतोय.

हेही वाचा… आजीबाईंची फुगडी कमाल! बाप्पासमोर आजीने दणक्यात घातली फुगडी, कोकणातील ‘हा’ VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

हा व्हिडीओ @viralinmaharashtra या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “असा डान्स करायचा असेल तरच माझ्या लग्नात यायचं” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय. तसंच या व्हिडीओला तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काहीही असो, पण बघायला भारी वाटतंय.” तर दुसऱ्याने “अरे ते तोंडातील पान थुंकून ये” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “अतिशय अप्रतिम, हा नृत्य प्रकार आदिवासी भागात केला जातो.”