Viral video: लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं. लग्नानंतर आयुष्याची नवी इनिंग सुरू होते. नवी स्वप्न उराशी घेऊन हे जोडपं आपलं आयुष्य पुढे नेण्याचं काम करत असतात. कुटुंबीयांकडूनही लग्नात कोणतीही कसूर केली जात नाही. अत्यंत धुमधडाक्यात लग्न लावू दिलं जातं. मुलीलाही चांगला नवरा मिळावा ही अपेक्षा असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून सर्वच अवाक् होत आहे.

काही नवरीबाई आपल्या नवरदेवाला स्पेशल फील करून देण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर काही मुली लग्नातही नवरदेवाला मान देत नाहीत. अशाच एका नवरीनं भर लग्नात आपल्याच नवऱ्याचा भयंकर अपमान केला आहे. या नवरीनं बिचाऱ्या नवरदेवासोबत भर लग्नात सर्व पाहुण्यांसमोर असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आता तुम्ही म्हणाल नवरीनं असं केलं तरी काय?? तर या नवरीनं स्टेजवर येताना नवरदेवानं पुढे केलेल्या हातावर थुंकली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेव स्टेजवर नवरीची वाट पाहत उभा आहे. यावेळी नवरी येते आणि नवरीला वर येण्यासाठी नवरदेव हात पुढे करतो. मात्र यावेळी नवरी नवरदेवाच्या हातात हात देण्याऐवजी चक्क नवरदेवाच्या हातावर थुंकते. नवरी अत्यंत संतापलेली होती. तिचा अवतार पाहून सर्वच अवाक् झाले. यावेळी नवरदेवासह सर्वच शॉक होतात. नवरीनं केलेल्या कृत्यावर सर्वजण टीका करत अखेर नवरदेव हे लग्न मोडतो.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ idiotic_sperm या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आहे. हा व्हिडीओ पाहून लोक तो प्रचंड व्हायरल करत आहेत. त्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे. एकाने तर लग्न झालं की नाही? असा सवाल केला आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “मुलींना खऱ्या प्रेमाची किंमतच नसते”, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.