सध्या लग्नाचा कालावधी सुरू आहे. लग्न म्हटलं की नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येत भरपूर मजा करतात. त्यानंतर त्यांनी लग्नात केलेल्या करामती देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये दिसत आहे की बुरखा घातलेली एक महिला स्टेजवर येते आणि वराला मिठी मारते. त्याच वेळी, ती त्याला किस करण्याचा प्रयत्न करते. नवऱ्याचा बाजूला उभी असलेली त्याची बायको हे सर्व बघत असते. पण त्यानंतर जे घडत ते पाहून तुम्ही चक्रावून जाल. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक व्यक्ती स्टेजवर येताना दिसत आहे. ती स्टेजवर येत नवरदेवाला मिठी मारते आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करते. ती महिला जवळ येताच नवरा तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा हटवतो आणि त्यानंतर तो जे काही बघतो त्याने तो स्वतः आश्चर्यचकित होतो. तो कोणी महिला नसून त्याचच मित्र असल्याचे त्याला समजते आणि तो हसू लागतो. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल)

( हे ही वाचा: लग्नात ‘डिजिटल शगुन’ ची भन्नाट कल्पना! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. JaikyYadav16 नावाच्या युजरने ते शेअर केले आहे. या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मित्रांचा अपमान. या व्हिडिओला आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.