लग्न समारंभ म्हटलं की, सगळ्याच गोष्टींची जय्यद तयारी सुरू असते. यात नवरी आणि नवरदेवाच्या पोशाखापासून ते लग्नातील जेवण अशा सर्वच गोष्टींच बजेट आखावं लागतं. सध्याच्या लग्नांमध्ये तर वधू किंवा वर यांची ग्रॅंड एन्ट्री हमखास पाहायला मिळते. अशात महागाईच्या याच काळात डोळ्यात अंजन घालणारा एक लग्न सोहळा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यात नवरदेवाने केलेली एन्ट्री पाहून सर्वच नेटकरी भडकले आणि या वराला त्याच्या लग्नाच्या दिवसाच्या स्टंटबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चांगलेच फटकारले आहे.

नवरदेवाची होतेय सर्वत्र चर्चा…

pune video a beautiful temple of balaji
Pune : पुण्यातील हे सुंदर मंदिर पाहिले का? व्हिडीओ होतोय व्हायरल
kiley paul sang the gulabi saree song at the airport
किली पॉल ‘गुलाबी साडी’ गाणं म्हणतो तेव्हा; मराठी ऐकून थक्क झाले नेटकरी, म्हणाले, “अरे भावा…”
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
chimpanzee Smoking a cigarette Viral Video
ओढतोय सिगारेट काढतोय धूर; चिंपांझीची ही स्टाईल पाहून युजर्स अवाक्; VIDEO वर म्हणाले, “हा पण बिघडला”
viral video a groom girlfriend reach on wedding stage
लग्नात अचानक पोहोचली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड ; भर मंडपात नवरी अन् गर्लफ्रेंडमध्ये तुफान राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
a girl beating a guy by chappal or footwear as he Was Passing Bad Comments on School girls
Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणाची मुलीने केली चपलेने धुलाई, घडवली चांगलीच अद्दल; व्हिडीओ होतोय व्हायरल
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO

नवरदेवाचा हा स्टंट एका उपस्थिताने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि TikTok वर पोस्ट केला. यामुळे वराच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओत लग्नाच्या ठिकाणी नवरदेव एका कॉफिन बॉक्समधून पोहोचल्याचं दिसतंय. ही चक्रावून टाकणारी घटना अमेरिकेतील आहे. यामुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. ख्रिश्चन धर्मीयांमध्ये मनुष्याचा मृत्यू झाला, की त्याला कॉफिन बॉक्समध्ये ठेवलं जातं. सगळे अंत्यविधी पूर्ण झाले की हा मृतदेह कॉफिन बॉक्ससहित जमिनीत दफन केला जातो. या अजब नवरदेवाने कॉफिन बॉक्सचा उपयोग वेडिंग व्हेन्यूवर जाण्यासाठी केला. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

(आणखी वाचा : विचित्रच! पठ्ठ्याने मॅगीमध्ये मिसळलं स्ट्रॉबेरी एनर्जी पेय; Viral Video पाहून खवय्ये भडकले!)

अशी झाली नवरदेवाची एन्ट्री

एंटरटेन स्कॉलर्स या नावाच्या यू-ट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओत आजूबाजूचं वातावरण लग्नसमारंभाचं दिसत आहे. एका गाडीतून काही पुरुष आणि महिला हसत-हसत कॉफिन बॉक्स घेऊन येताना दिसत आहेत. पुढे हा कॉफिन बॉक्स उपस्थितांसमोर ठेवला जातो. बॉक्स घेऊन येणारे स्त्री-पुरुष तिथेच उभे राहतात. एक व्यक्ती हा कॉफिन बॉक्स उघडते आणि त्यातून चक्क सुटाबुटातला नवरदेव उठून उभा राहतो. सोशल मीडियावर लग्नाचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. १ मिनिट ११ सेकंदांच्या या व्हिडीओला हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.