scorecardresearch

घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे याची चर्चा आहे.

barat video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: honey._.event_official / Instagram)

लग्नाचे आणि मिरवणुकीचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. हा व्हिडी’ओ एका वरातीचा आहे. व्हिडीओमध्ये जे काही घडते ते पाहून तुमचे मन चक्रावून जाईल. कारण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला समजणार नाही की हा विवाहसोहळा (Marriage) आहे की विनोद. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडे याची चर्चा आहे.

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव घोडीवर बसलेला आहे. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. ते पुढे येतात आणि काही तरी उचलताना दिसतात. नंतर पुढे लक्षात येत की घोडीला खाटेवर उभ करण्यात आलं होत. घोडीवर नवरदेव असतानाच ते सगळे लोक खाटेला उचलतात आणि मग आणि गोल गोल फिरू लागतात.

(हे ही वाचा: नवरीने रागाने वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात फेकली आणि…; बघा हा Viral video)

(हे ही वाचा: Video: उंचीने ‘छोट्या’ या नवरदेव नवरीचा SWAG बघितला का?)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ honey._.event_official नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. शेवटी काय चालले आहे ते लोकांना समजतही नाही. कारण असा डान्स यापूर्वी कोणीही पाहिला नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom was sitting on a mare people lifted both of them with cot video viral ttg

ताज्या बातम्या