Video Viral : सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. तरुण मंडळीबरोबर आता सर्वच वयोगटातील लोकं सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलांचा एक ग्रुप तुफान डान्स करताना दिसत आहे. या महिलांचा सुंदर डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पाच महिलांचा एक ग्रुप नाचताना दिसत आहे. या महिला “प्रेमाची लागली भन्नाट” या गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहे. यांचा ग्रुप डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या पाच महिला या गाण्यावर एक सारख्या स्टेप्स करताना दिसत आहे. त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हालाही त्यांच्यासारखा डान्स करावा, असे वाटू शकते.
हेही वाचा : “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त…” उखाण्यातून नवरीने मांडली व्यथा, नवरदेव पाहतच राहिला…
navinmarathijokes या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “”प्रेमाची लागली भन्नाट” या व्हिडीओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. एका युजरने लिहिलेय, “मस्तच!एकदम कडक” तर एका युजरने लिहिलेय, “महिलांनी खूप छान डान्स केला आहे”