गुजरातमधील एका ८ वर्षांच्या मुलीने खेळण्या बागडण्याच्या वयातच संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ही मुलगी सूरतमधील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक धनेश यांची मुलगी आहे. देवांशी संघवी असं या मुलीचं नाव असून, ती दोन बहिणींमध्ये मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिरे व्यापाऱ्याची मुलगी देवांशी संघवीने ३६७ दीक्षा कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिला संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली होती.

दोन बहिणींमध्ये मोठी असल्याने ८ वर्षांची देवांशी संघवी कोट्यवधींच्या हिरे कंपनीची मालकीण बनली असती. मात्र तिने या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. देवांशीच्या वडिलांचा हिऱ्याचा मोठा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीची जगातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ऑफिस आहेत. या सर्व संपत्तीचा आणि आलिशान जीवनाचा त्याग करत देवांशीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. देवांशी बुधवारी संन्यास घेणार आहे. यानिमित्त मंगळवारी शहरातून हत्ती, घोडे, उंटांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

हेही वाचा- WhatsApp ग्रुपद्वारे पंडित प्रदीप मिश्रांच्या भक्तांची फसवणूक, आरोपींनी मिश्रांचा फोटो डीपीला ठेवला अन्…

बेल्जियममध्येही मिरवणूक –

देवांशीच्या कुटुंबीयांनी बेल्जियममध्येही अशीच मोठी मिरवणूक काढली होती. हे कुटुंब ‘संघवी अँड सन्स’ चालवते, ज्याची करोडोंमध्ये उलाढाल आहे. त्यांची कंपनी जुने हिरे उत्पादक करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. देवांशीचे वडील धनेश सांघवी यांना देवांशी आणि पाच वर्षांची काव्या या दोन मुली आहेत. धनेश, त्याची पत्नी अमी आणि दोन्ही मुली पहिल्यापासून धार्मिक जीवनशैलीचे पालन करतात.

‘देवांशीने कधीच TV पाहिला नाही’ –

हेही पाहा- मालकिणीला घरकामात मदत करताना वानराची दमछाक, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या संघवी यांच्या एका कौटुंबिक मित्राने सांगितले की, “देवांशीने कधीही टीव्ही, चित्रपट पाहिले नाहीत शिवाय ती बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा लग्नसोहळ्यालाही कधी गेलेली नाही. देवांशीने आतापर्यंत ३६७ दीक्षा कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.” देवांशी दोन वर्षाची असतानाच पालीताना उपवास केला आणि संन्यासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला होता.

हेही पाहा- ‘घर मोहे परदेसिया’ गाण्यावर थिरकली मुकेश अंबानींची धाकटी सून; मेहेंदी सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एकाने सांगितले की, “मोठा व्यवसाय असूनही, संघवी कुटुंब साधे जीवन जगते. त्यांच्या लक्षात आले आहे की, आपल्या मुलींला सर्व सांसारिक सुखांपासून दूर राहायचे आहे.” दरम्यान, दीक्षा घेण्यासाठी निवड होण्यापूर्वी, देवांशीने भिक्षुंसोबत ६०० किमीचा प्रवास केला आणि अनेक कठीण दिनचर्येनंतर तिला तिच्या गुरूंनी संन्यास घेण्याची परवानगी दिली. जैनाचार्य कीर्तिसुरीश्वरजी महाराज यांच्याकडून तिला दीक्षा दिली जाणार आहे.