Guru Purnima 2025 Date Rituals : प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूला एक महत्त्वाचे स्थान असते. गुरू हा खरा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक मानला जातो. कारण- आई-वडिलांनंतर गुरू हा आपल्या ज्ञान आणि मार्गदर्शन करीत जीवनाला दिशा देत असतो. त्यात हिंदू धर्मात गुरूला देवासमान स्थान आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्या दिवशी गुरुप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते. पण, यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे? त्याची नेमकी तारीख आणि महत्त्व जाणून घेऊ…
गुरुपौर्णिमेची तारीख आणि तिथी (Guru Purnima 2025 Date And Tithi)
वैदिक पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात १० जुलै रोजी पहाटे १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल.

गुरुपौर्णिमा पंचांग १० जुलै २०२५ ( Guru Purnima 2025 Panchang)
सूर्योदय – सकाळी ०५:३१ वाजता
सूर्यास्त – रात्री ०७:२२ वाजता
चंद्रोदय – संध्याकाळी ०७:२० वाजता
चंद्रास्त – नाही
ब्राह्म मुहूर्त – पहाटे ०४:१० ते ०४:५० पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२:४५ ते ०३:४० पर्यंत
संधिप्रकाश वेळ – संध्याकाळी ०७:२१ ते ०७:४१ पर्यंत
निशिता मुहूर्त – सकाळी १२:०६ ते १२:४७ पर्यंत

गुरुपौर्णिमेचे महत्व (Guru Purnima 2025 Significance)
गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वेद व्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती. त्यातील वेदातून त्यांनी मानवजातीला ज्ञान दिले. त्यामुळे याला व्यास पौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून, त्यांचे आशीर्वाद घेतात.