गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये विश्वचषकाचा रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराटने ९७ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर मोठा विजय संपादन केला असून विश्वचषकातील आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. यावेळी स्टेडियममध्ये एक हलका-फुलका क्षण पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान, बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी प्रेक्षकांनी शुबमन गिलकडे पाहून सारा तेंडुलकरच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” अशा घोषणा प्रेक्षकांनी दिल्या.

KL Rahul Catch and LSG Owner Sanjeev Goenka Reaction Video
LSG v DC: केएल राहुलचा डायव्हिंग झेल पाहून संजीव गोयंका जागेवरून उठले अन्… VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
ipl 2024 ms dhoni madness was seen in narendra modi stadium fan breaches security and bows down in front of him during gt vs csk match
धोनीची हवा, हा तर जबरा फॅन भावा! हेलिकॉप्टर शॉट मारताच चाहत्याची मैदानात धाव अन्…; VIDEO व्हायरल
BCCI look for new coach: Rahul Dravid can re-apply, says Jay Shah
टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? जय शाह यांनी राहुल द्रविडच्या कार्यकाळाबद्दल दिली मोठी अपडेट
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
KL Rahul and Shreyas Iyer video viral
VIDEO : राहुलने सुपरमॅनप्रमाणे हवेत झेपावत घेतला श्रेयसचा अप्रतिम झेल, ‘कॅच’ पाहून गोलंदाजाने जोडले हात
Irfan's objection to making Hardik vice-captain
T20 World Cup 2024 : हार्दिकला उपकर्णधार करण्यावर इरफान पठाणने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, “त्याच्यापेक्षा बुमराह…”
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’

याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. तर शेकडो प्रेक्षक सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणा देत आहेत. पण शुबमन गिल मात्र प्रेक्षकांना प्रतिसाद न देता क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

भारत-बांगलादेश सामन्यात काय घडलं?

बांगलादेशने टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य दिलं होतं. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला.यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. भारताचा माजी कर्णधार ९७ चेंडूत १०३ धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या १९ धावा करून बाद झाला. याशिवाय केएल राहुल ३४ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा- IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या. या खेळाडूने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला एक विकेट मिळाली. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. तत्पूर्वी, तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.