Handpump Catches Fire: एखाद्या गावातील पाणी भरण्याची जागा ही सर्वात विचित्र गप्पांचे उगमस्थान असते असे म्हणायला हरकत नाही. अगदी नळावरच्या भांडणांपासून ते वॉटर कूलर गॉसिप पर्यंत जागा जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्हाला नेहमीच काहीतरी हटके ऐकण्याची संधी याच ठिकाणी मिळते. पण आता मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घडलेली घटना इतकी विचित्र आहे की ती प्रत्यक्ष पाहणारे गावकरीच नव्हे तर नेटकरी सुद्धा बुचकळ्यात पडले आहेत. छ्तरपूरमधील कच्चर गावातील एका सार्वजनिक हॅन्डपंपमधून पाण्यासोबत आगीचा उद्रेक पाहायला मिळाला.

आपण अनेकदा अशा प्रकारे हॅन्डपंप फुटून पाण्याचे कारंजे उडू लागल्याचे पाहिले असेल, तसाच काहीसा प्रकार या व्हिडीओच्या सुरुवातीला सुद्धा पाहायला मिळाला पण काही सेकंदातच या पाण्यासोबत आग सुद्धा बाहेर येऊ लागली. एखाद्या ड्रॅगनच्या तोंडातून आगीचा फवारा बाहेर यावा तशीच काहीशी ही घटना आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून ही बातमी हॅन्डपंप मधील आगीसारखी गावभर पसरली आहे.

Domino’s ने महिलेला विचारला ‘हा’ एक प्रश्न..इज्जत गेलीच वर तीन लाखाचे नुकसान

हॅन्डपंप मधून आगीचा उद्रेक

गावकरी म्हणतात..

या घटनेनंतर गावामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. ही चमत्कारिक घटना आहे आणि कोणाचा तरी गावावर कोप झाल्याचे म्हंटले जात आहे, तर तज्ज्ञांनी हा प्रकार रासायनिक गळतीमुळे घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. (हे ही वाचा: Video: अति घाई अन… वॉटरपार्कच्या स्लाईड मध्ये अडकून पडल्या दोन तरुणी, इतक्यात…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भोपाळमधील सरकारी विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी याविषयी माहिती देत सांगितले की, गाळाच्या खडकांमधील वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष (वाळूचा खडक, चुनखडी आणि शेल) दलदलीच्या भागात जमा होतात आणि मिथेन तयार करतात. रासायनिक क्रियामुळे अशाप्रकारे उष्णता वाढून पाण्यातून अशा प्रकारे आगीचा उद्रेक झाला आहे.