Anand Mahindra Mother’s day Post : तुमच्यावर आईसारखी निस्वार्थी माया जगात कोणी करु शकत नाही, त्यामुळे आईच्या प्रेमाची तुलना जगात कोणत्याही गोष्टीबरोबर करता येत नाही. वेळेप्रसंगी आपल्या लेकरासाठी संकटापुढे ढाल बनून उभी राहते ती म्हणजे आई असते. मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट उपसते, त्यांना लहानाच मोठ करते, चांगले शिकवते, एक चांगला व्यक्ती घडवते. या निस्वार्थी प्रेम करणाऱ्या आईवर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला केला जातो. यानिमित्ताने अनेकजण आईला वेळात वेळ काढून शुभेच्छा देतात, तिचे कौतुक करतात, तर काहीजण आईच्या आठवणीने भावूक होताना दिसतात, अशाचप्रकारे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा देखील आईच्या आठवणीने भावूक होताना दिसले. त्यांनी आईबरोबरचा ४७ वर्षे जुना पोस्ट करत आईच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ‘मदर्स डे’च्या विशेष प्रसंगी त्यांची आई इंदिरा महिंद्रा यांची आठवण करून देणारा एक जुना फोटो एक्स (ट्विटर) वर पोस्ट केला आहे. या फोटोत आनंद महिंद्रा आपल्या आईच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे.

आनंद महिंद्रांची आईसाठी भावनिक पोस्ट

फोटो शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “हा फोटो १९७७ मध्ये काढला होता… मी कॉलेजला जाण्यापूर्वीचा तो काळ होता. माझी आई कॅमेऱ्याकडे पाहत नव्हती, नेहमीप्रमाणे ती दूरवर पाहत होती… तिच्या मुलांच्या भविष्याची कल्पना करत होती, या आशेने की, चांगले शिक्षण त्यांच्या यशाचा आणि आनंदाचा पासपोर्ट असेल. मदर्स डेच्या शुभेच्छा आई. आम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू…”

आई झाली कसाई! चिमुकलीला पलीत्याने चोपलं, गळा दाबला मग फरपटत नेत…; अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टने लोकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर यूजर्स त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहत तो फोटो लाइक करत आहेत. आनंद महिंद्रा आपल्या आईवर किती प्रेम करतात आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किती समर्पित आहेत याचा पुरावा ही पोस्ट आहे.

आनंद महिंद्रा यांच्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकारणी, अनेक बडे उद्योजक, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सने देखील सोशल मीडियावर आईबरोबरचे फोटो पोस्ट करत सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अनेकांनी आपल्या आईबरोबरच्या चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे, तसेच आईवर असलेले प्रेम व्यक्त केले आहे.