Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे, तर काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात. तसेच काही व्हिडीओ आपल्याला लाख मोलाचा संदेश देऊन जातात. यातील मोजकेच व्हिडीओ क्षणार्धात प्रचंड व्हायरल होऊन लाखो व्ह्यूज मिळवतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात असं काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून तुम्ही भावूक व्हाल.

वय कितीही असो, अनेक जण आयुष्यातील अडथळ्यांना दूर करण्यासाठी फक्त मेहनतीवर लक्ष केंद्रित करतात. हल्लीची पिढी एखादं संकट आलं तरी लगेच पळ काढतात. पण, पूर्वीचे लोक अशा संकटांमध्ये कधीही हार मानायचे नाही. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होतोय, ज्यात एक वयोवृद्ध आजी भरपावसात असं काही करत आहेत, जे पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये भाजी विकायला बसलेल्या आजीबाई भाजी विकत असताना अचानक पाऊस पडायला सुरुवात होते. यावेळी आजींनी वर लावलेल्या मोठ्या छत्रीतूनही भाज्यांवर आणि त्यांच्या अंगावर पाणी पडतं. अशा मुसळधार पावसात त्या जागच्या हालत नाहीत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण त्यांचे कौतुक करत आहेत, तर अनेक जण भावनिक झाले आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’नंतर ‘काली बिंदी’ गाण्याची परदेशातही हवा; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पॉंडचा जबरदस्त डान्स, Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_pratimapramanick_12 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “गरिबी माणसाला प्रत्येक संकटातून जाण्याची ताकद देते.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “आजी तुम्ही खूप ग्रेट आहात.” आणखी एकाने लिहिलेय, “यांना पाहून मला माझ्या आईची आठवण आली.”