पाळीव प्राण्यांचे गोंडस हावभाव दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपण करतो ती प्रत्येक गोष्ट या प्राण्यांना देखील करायची असते. कधीकधी हे प्राणी आजुबाजुच्या व्यक्तींची इतकी हुबेहूब नक्कल करतात की ती पाहून आपणही आश्चर्यचकित होतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओने उद्योगपती हर्ष गोएंका यांचे मन जिंकले असून त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ :
आणखी वाचा : गरीब माणसाने कुत्र्याला केलेली मदत पाहून नेटकरी झाले भावूक; पाहा Viral Video
या व्हिडीओमध्ये एक कुत्रा मालकाची हुबेहूब नक्कल करत असलेला दिसत आहे. मालक ज्याप्रमाणे उड्या मारत पुढे जात आहे, कुत्रा देखील त्याचे अनुकरण करत तसाच पुढे जातो. कुत्र्याला अशाप्रकारे आनंदाने बागडताना पाहून ‘माझ्या चेहऱ्यावर हसू आले’ असे कॅप्शन हर्ष गोएंका यांनी दिले आहे. नेटकऱ्यांनाही या कुत्र्याचा उत्साह आवडला असून, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.