जेव्हाही तुम्हाला इतर कोणत्याही कंपनीकडून ऑफर येते, तेव्हा सर्वप्रथम तुम्ही सध्याच्या कंपनीतील तुमच्या बॉसला तुमचे राजीनामा पत्र पाठवता. राजीनाम्याच्या वेळी मेलवर काय लिहावे आणि काय नाही हे काही लोक गुगलवर शोधून काढतात, पण काही लोक असे असतात जे राजीनाम्याच्या पत्रात काहीही लिहितात, ज्यामुळे त्यांची छाप खराब होते. मात्र, सध्या अशा एका राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अतिशय साधा आणि छोटा आहे. तुम्ही हे राजीनामा पत्र वाचायला सुरुवात करताच, ते लगेचच संपेल, कारण ते अत्यंत लहान राजीनामा पत्र आहे.

एका राजीनामा पत्राने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे एक लहान आणि थक्क करणारे पत्र आहे, कारण त्यात वाचण्यासारखे काहीही लिहिलेले नाही. तथापि, या राजीनाम्याने इंटरनेट युजर्स चांगलेच खूश असून प्रत्येकजण त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहे. अर्थात, राजीनाम्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ट्विटरवर युजर्स राजीनाम्याचे अनेक फोटो शेअर करत आहेत.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

कावेरी नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘शॉर्ट अँड स्वीट’ असे लिहिले आहे. तुम्हाला सर्वात लहान राजीनामा पत्र वाचले का? कर्मचाऱ्याने त्याच्या रेजिग्नेशन लेटरमध्ये लिहिले, ‘प्रिय सर, विषय: राजीनामा पत्र, बाय बाय सर.’ शेवटी त्यांनी स्वतःची सही केली.

रस्त्यावरील मुलीसोबत करत होता Prank; नंतर करून घेतला स्वतःचाच जाहीर अपमान; पाहा Viral Video

एका यूजरने लिहिले की, ‘मला गेल्या आठवड्यात राजीनामा मिळाला होता, तो त्याहून लहान होता. तो व्हॉट्सअ‍ॅपवर होता, ज्या दिवशी त्याचा पगाराचा चेक आला होता.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल झालेल्या राजीनाम्याबद्दल नेटिझन्सनी आपली मते मांडली. रेजिग्नेशन लेटर पाहिल्यानंतर काही यूजर्सनी त्यांचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले.