आईस्क्रीमवरील इडलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी, उद्योगपती हर्ष गोएंका यांनी गुलाबी रंगाचा स्ट्रॉबेरी समोसा आणि चॉकलेट समोसाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला बघून नेटिझन्स याबद्दल अजिबात खूश नाहीत. अनेकांनी व्हिडीओ काढला पाहिजे असेही सांगितले, तर काहींनी सांगितले की हे कॉम्बीनेशन गुन्हा आहे. काहींनी तर ज्याने हे समोसे बनवले त्याला तुरुंगात टाकले पाहिजे अशीही मागणी केली. हर्ष गोएंका यांनाही हा व्हिडीओ बघून धक्का बसलेला आहेच. ते हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहतात की, “सोशल मीडियावर लॉलीपॉप इडली फिरत आहे हे ठीक आहे, पण हे ?”.

काय आहे व्हिडीओमध्ये?

१८ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, एक माणूस फॉइल पॅकमध्ये दोन समोसे दाखवताना दिसतो. त्यात एक चॉकलेट समोसा आणि दुसरा गुलाबी रंगाचा जाम भरलेला स्ट्रॉबेरी समोसा दिसून येतो. हा व्हिडीओ एका फूड ब्लॉगरच्या व्हिडीओची एक क्लिप असल्याचे दिसते जे समोसाच्या विचित्र कॉम्बिनेशनचा आस्वाद घेण्यासाठी फूड स्टॉलवर गेले होते. व्हिडीओची सुरुवात चॉकलेट समोसा दाखवून होते. मग, तो माणूस स्ट्रॉबेरी समोसा उघडतो आणि दर्शकांना त्याच्यात जाम भरलेला आहे हे दाखवतो. व्हायरल व्हिडीओमध्ये तंदूरी पनीर समोसाही दिसत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

जेव्हापासून हा व्हिडीओ हर्ष गोएंका यांनी शेअर केला आहे, तेव्हापासून त्याला २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स आणि रीट्वीट मिळाले आहेत. नेटिझन्सनी “अशा फ्युजन फूडविरोधात कायदा असावा”, एक उत्सुक स्ट्रीट फूड प्रेमी म्हणून, मी हा व्हिडिओ इंटरनेटवरून काढून टाकण्याची विनंती करतो ”,“ मी फक्त या स्तरावर प्रयोग करू शकत नाही ”अशा कमेंट्स पोस्ट केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.