आपण फार क्वचितच वयस्कर मंडळींना डान्स करताना पाहतो. अशातच वृद्ध व्यक्तींचा एखादा डान्स व्हिडीओ समोर आल्यास तो बघता बघता इंटरनेटवर व्हायरल होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये दोन वयस्कर व्यक्ती ढोलाच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या दोन व्यक्तींना उत्साहात नाचताना पाहून तुम्हालाही आनंद होईल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दोन वृद्ध व्यक्ती ढोलचा आवाज ऐकताच अगदी उत्साहात नाचू लागतात. विशेष म्हणजे या व्यक्ती काठीचा आधार घेऊन नाचताना दिसत आहेत. एका गावातील कार्यक्रमातला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हे दोन वृद्ध अगदी मनमुराद नाचण्याचा आनंद घेत आहेत.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

गरमीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; Viral Video पाहून पोट धरून हसाल

Twitter चं ‘Edit’ फीचर म्हणजे ‘एप्रिल फुल प्रॅन्क’ की…? ट्विटरच्या ‘या’ उत्तराने नेटकरीही गोंधळले

त्यांचा डान्स बघून नेटकरी या आजोबांचे फॅन झाले आहेत. या वृद्ध व्यक्तींचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असावे. मात्र व्हिडीओ पाहून या दोघांना आपल्या तारुण्याचे दिवस आठवले असावेत असं वाटत आहे.

व्हिडीओतील सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे हे आजोबा नाचत असताना काही महिला येतात आणि पैसे ओवाळून त्यांची नजर काढतात. या महिला एकप्रकारे काठीच्या जोरावर नाचणाऱ्या दोन आजोबांचा उत्साह वाढवतात.

दुसरीकडे हे वृद्ध या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता मस्त नाचत आहेत. कोण येतंय आणि कोण जातंय याची त्यांना पर्वा नसते. @Ratnesh191298 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.