Crocodile Attack Viral Video: शांत वातावरण, आजूबाजूला उभे असलेले काही लोक आणि पाण्याच्या काठावर दबा धरून बसलेली एक मगर. सुरुवातीला सगळं अगदी नेहमीसारखं भासतं. एक व्यक्ती हातात मांस घेऊन, त्या मगरीला खायला घालण्यासाठी पुढे सरकतो. गर्दीतले लोक थोड्या अंतरावर उभे राहून कौतुकाने हे दृश्य पाहत असतात. पण, पुढच्या क्षणी काय घडलं हे कोणीच कल्पनाही केली नव्हती.

मगर सुरुवातीला मांसाकडे शांतपणे पाहतो. काही क्षणांसाठी असं वाटतं की, सगळं सुरळीत पार पाडलं जाईल. पण अचानक तो प्रचंड वेगाने पुढे झेपावतो आणि मांसाकडे जाण्याऐवजी थेट त्या व्यक्तीवर झडप घालतो. काही सेकंदांसाठी जणू मृत्यू समोर उभा राहिल्याचा भास होतो. पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले जातात, अंगावर शहारे उठतात आणि वातावरणात किंकाळ्या पसरतात.

त्या क्षणात लोकांना वाटतं – आता सगळं संपलं. मगरीच्या जबड्यात एकदा काही अडकलं, तर सुटणं जवळपास अशक्य… त्याची ताकद इतकी जबरदस्त की, मोठमोठे प्राणीही त्याच्यापुढे टिकत नाहीत. हा माणूस वाचणार का नाही, याची धाकधूक सगळ्यांना सतावत असते.

तेव्हाच एक प्रशिक्षक, जीवाची पर्वा न करता, विजेच्या चपळाईने धावत येतो. हातचलाखीने तो मगरीचं लक्ष विचलित करतो आणि कसाबसा त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढतो. त्या माणसाच्या डोळ्यांतल्या भीतीतून स्पष्ट जाणवतं – मृत्यू फक्त काही इंचांवरून सरकत गेला होता. हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर टाकताच लोकांच्या अंगावर काटा आला. काही सेकंदांच्या व्हिडीओनं दाखवून दिलं की, प्रकृतीशी खेळणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण…

मगर… पाण्यात असो की जमिनीवर, तिच्या हालचालींमध्ये नेहमीच एक वेगळा खौफ असतो. जगातील सर्वांत धोकादायक प्राण्यांमध्ये मोजल्या जाणाऱ्या मगरीच्या जबड्यात इतकी प्रचंड ताकद असते की, त्यामुळे क्षणात हाडं चिरडून टाकली जाऊ शकतात. अशाच एका मगरीचा खौफनाक हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहेत.

मगरीला मांस खाऊ घालण्याची मोठी चूक

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक व्यक्ती हातात मांस घेऊन मगरीला खाऊ घालायला जाते. सुरुवातीला सगळं सुरळीत दिसतं; पण क्षणात परिस्थिती बदलते. मांसाकडे येणारी मगर अचानक थेट त्या व्यक्तीवर झडप घालते. ते दृश्य इतकं भयावह होतं की, पाहणाऱ्यांचा थरकाप उडतो. क्षणभरासाठी उपस्थित सगळेच लोक थिजून जातात.

प्रशिक्षकाच्या तत्परतेमुळे वाचला जीव!

परिस्थिती इतकी बिकट झाली की, जर योग्य वेळी प्रशिक्षक धावून आला नसता, तर त्या व्यक्तीचा अंत जवळपास निश्चित होता. ऐन वेळी प्रशिक्षकाने अफाट धाडस आणि चातुर्य दाखवीत मगरीचं लक्ष विचलित केलं आणि त्या व्यक्तीला कसंबसं सुरक्षित बाहेर काढलं. ती व्यक्ती मृत्यूच्या किती जवळ होती, हे त्याच्या चेहऱ्यावरील भीतीतून स्पष्ट दिसत होतं.

सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच अक्षरशः खळबळ उडाली. अवघ्या १७ सेकंदांचा हा व्हिडीओ तब्बल ६० लाखांहून अधिक वेळा पाहिला. हजारो लोकांनी त्याला लाइक्स दिलेत, तर कमेंट्समध्ये भयानक प्रतिक्रियांचा पूर आला आहे. कोणीतरी लिहिलं, “भाऊनं तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंचितही प्रयत्न केला नाही!” तर दुसरा म्हणाला, “मगर खूप भुका होता, एवढ्या छोट्या तुकड्यानं काय भागणार?” एका युजरनं तर स्पष्ट म्हटलं, “हे दृश्य इतकं भयानक आहे की, झोपेतही आठवलं, तर अंगावर काटा येईल.”

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, मगरीसारख्या खतरनाक प्राण्याशी खेळ करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ करणं!