Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस झाल्यानंतर आपला पहिला पगार लेकानं आईच्या हातात दिला आहे. हा भावनीक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा मुलगा पगार झाल्यानंतर एटीएण मध्ये जातो आणि पगाराचे पैसे काढतो. त्यानंतर तो घरी जाऊन हा पगार त्याच्या आईच्या हातात देतो. लेकाचा पहिला पगार पाहून आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान यावेळी पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत या मुलानं कॅप्शनही लिहलं आहे. हे कॅप्शन वाचून तुम्हालाही या मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

“खरंतर पहिला पगार नाही आमच्या आईसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचं पगार हा आमच्या आईसाहेबांच्या हातात जाणार. आम्ही अजून इतके मोठे नाही झालो की आमचा पगार स्वतः जवळ ठेवू आणि स्वतःच्या इच्छेने खर्च करू. बरेच मुलं लग्न झालं की त्यांचा संपूर्ण व्यवहार हा त्यांच्या बायकोच्या हातात देऊन टाकतात पण आम्ही तसा नाही करणार जेव्हा पर्यंत आई बाबा आहेत तेव्हा पर्यंत घरातच संपूर्ण व्यवहार हा आई-बाबांचा हातातच असणार.

माझ्यासोबत पोलीस झालेले माझे बरेचसे मित्र कोणी गाड्या घेतल्या कोणी आय फोन घेतले तर कोणी काय प्रत्येकाने त्यांच्या पैशाने हाऊस मोस मजा करून घेतले. पण आम्ही तसं काही न करता आमचा जितका काही पगाराला आमच्या आईसाहेबांच्या हातात दिला आमचा आनंद हा नवीन गाडी घेण्यात किंवा नवीन फोन घेण्यात नव्हता तर आमच्या आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती आनंद कसा येणार आमच्या आईसाहेब सगळ्या टेन्शन मुक्त घोषवाक्य होणार याच्यातच आमचा आनंद होता.

आयुष्याचा फक्त एकच उद्देश

माझ्या आयुष्याचा फक्त एकच उद्देश आहे की जेव्हा पर्यंत आमचे आई-बाबा आमच्या सोबत आहेत तेव्हापर्यंत त्यांना इतकं खुश ठेवायचं इतकं आनंद द्यायचा की जेव्हा त्यांच्या शेवटची वेळ येईल जेव्हा ते शेवटचा श्वास घेतील तेव्हा त्यांची फक्त एकच इच्छा असली पाहिजे की मी माझे शेवटचे काय क्षण माझ्या मुलासोबत घालवायचे आहेत.आई वडील आपल्या डोक्यावरचे छत्र आहेत एकदा तुमच्या डोक्यावरचे छत्र हरपलं नंतर तुम्हाला कोणीच नाही विचारणार त्यांच्यामुळे तुमची ओळख आहे एकदा ते गेले नंतर तुम्हाला कोणीच नाही विसरणार म्हणून जेव्हा पर्यंत आई-वडील तुमच्यासोबत आहेत तेव्हा पर्यंत त्यांची कदर करायला शिका.” असं कॅप्शन लिहंल आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: पार्किंगवरून वाद! नवरा-बायकोला बेदम मारहाण; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. आई-वडिलांनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.