Viral Video Children Crying School Closed: पाठीवर दफ्तराचं ओझं, अंगात शाळेचा युनिफॉर्म, डोळ्यांत शिकण्याची उमेद… आणि अचानक समोर उभं राहतं बंद दरवाजांचं वास्तव. एका छोट्याशा गावात असं काही घडलं, ज्यामुळे संपूर्ण गाव आणि लाखो नेटिझन्स भावनिक झाले. शाळा बंद झाली… पण त्याचं दु:ख केवळ शिक्षण थांबलं म्हणून नव्हतं; ते स्वप्नांचं, सवयींचं आणि त्या छोट्या मनांतील जगाचं तुटणं होतं. एक दिव्यांग मुलगी जेव्हा रडवेल्या स्वरात म्हणते, “मी आता शाळेत जाऊ शकत नाही…” तेव्हा शब्द संपतात आणि संवेदना बोलू लागतात. ही फक्त शाळा नव्हती, ती या मुलांची दुसरी आई होती… आता मात्र त्या आईचं दार कायमचं बंद झालंय, नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घ्या…

दररोजप्रमाणे सोमवारी सकाळी लहानग्यांनी आपली शाळेची पोतडी घेतली, गणवेश घातला आणि आनंदात शाळेकडे पावलं टाकली. पण, जेव्हा त्यांनी शाळेचा दरवाजा बंद पाहिला, तेव्हा त्यांची आशा क्षणातच तुटली. काही मुले काही वेळ त्या बंद गेटपाशी उभी राहिली… आणि अचानक फाटलेल्या भावनांनी त्यांचा बांधच फुटला.

“मॅडमजी, आम्ही इथेच शिकणार… कुठेही जाणार नाही!” असं म्हणत एका मुलाने आपल्या शिक्षिकेला घट्ट मिठी मारली. हे दृश्य पाहून उपस्थितांचं काळीजही थरथरलं. पण, सगळ्यात जास्त मन हेलावून टाकणारा क्षण आला तो एका दिव्यांग मुलीच्या अश्रूंनी. तिच्या थरथरत्या आवाजात फक्त एवढंच निघालं, “मी आता शाळेत जाऊ शकणार नाही…” कारण नवीन शाळा लांब आहे आणि तिच्यासारख्या विद्यार्थिनीसाठी तिथपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य आहे.

या शाळेला शेजारच्या कस्तुरीटन गावातील शाळेत विलीन करण्यात आलं आहे, पण ती शाळा मुलांसाठी योग्य सुविधांशिवाय आहे. तिथं ना योग्य टॉयलेट आहे, ना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा. गावकरी आणि पालकांनी एकच मागणी केली आहे, “जोपर्यंत नवीन शाळा पूर्ण सुसज्ज होत नाही, तोपर्यंत आमच्या जुन्या शाळेला पुन्हा सुरू करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर @SaralVyangya ह्या युजरने तो शेअर केला असून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युजरने लिहिलं, “विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी शाळा बंद करणं योग्य निर्णय नाही.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “या मुलांच्या डोळ्यात पाणी आहे, पण आपण आपली नजर अजूनही झाकून बसणार का..?”