Cobra and Nagin Emotional Video: आपल्या जवळच्या माणसाला किंवा जीवाला गमावणे म्हणजे किती असह्य वेदना असते हे शब्दांत सांगता येत नाही. प्रेमाचं नातं फक्त माणसांमध्येच नसतं तर जीव-जंतूमध्येही तेवढंच खोलवर असतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ याचीच जाणीव करून देतो. यात एक नाग तडफडत प्राण सोडताना दिसतो आणि त्याच्या अगदी शेजारी बसलेली नागीण फक्त आपल्या जोडीदाराकडे टक लावून पाहत राहते.

या दृश्याने हजारो नेटिझन्सच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. “आपलेच आपल्याला सोडून जातात तेव्हा होणारा वेदनादायक रिकामेपणा हा क्षण दाखवतो,” अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.

नागिणीची हृदय हेलावून टाकणारी वेदना

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते, नाग जमिनीवर निष्प्राण अवस्थेत पडला आहे, तर नागीण त्याच्यासमोर फणा पसरून भांबावल्यासारखी उभी आहे. तिच्या डोळ्यातला शून्यपणा, वेदना आणि असहायता अगदी स्पष्ट जाणवते. काही क्षण ती हलतही नाही, जणू काही तिला अजूनही विश्वास बसलेला नाही की तिचा सोबती आता या जगात नाही.

हा व्हिडीओ जानेवारी महिन्यात दानिश गुल जुनैद नावाच्या व्यक्तीने एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट केला होता. त्या वेळी फारसे लक्ष वेधून न घेतलेला हा व्हिडीओ आता अचानक जोरात व्हायरल होत आहे.

लोकांच्या भावना शब्दात मांडता येत नाहीत

या दृश्याने लोकांची मनं अक्षरशः द्रवली आहेत. एका युजरने लिहिलंय, “जेव्हा आपलं कोणी निघून जातं, तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दांत सांगता येत नाहीत.” दुसऱ्याने म्हटलं, “हे पाहून माझं हृदय तुटलं.” काहींनी तर जीव-जंतूंचं प्रेम मानवांपेक्षा कितीतरी खोल असल्याचंही नमूद केलं.

नाग-नागिणीच्या प्रेमकथेला लोककथांपासून चित्रपटांपर्यंत अनेक पिढ्यांनी गौरवलं आहे. पण, या वास्तव व्हिडीओमध्ये दिसलेला क्षण त्याहूनही जास्त हृदयस्पर्शी आहे.

सोशल मीडियावर चर्चा रंगली

या भावनिक व्हिडीओला जरी खूप व्ह्यूज मिळालेले नसले, तरी कमेंट बॉक्समधील भावना सांगतात की प्रेक्षक किती भावूक झाले आहेत. काहींनी या प्रसंगाला “सर्वात मार्मिक दृश्य” म्हटलं, तर काहींनी हे “जीवजंतूंच्या नात्याचं खरं दर्शन” असल्याचं सांगितलं.

येथे पाहा व्हिडीओ

याआधीही एका विशालकाय कोब्राचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तो लोकांवर हल्ला करताना दिसला होता. पण, सध्याचा हा व्हिडीओ भीती नव्हे तर वेदना आणि प्रेमाची खरी ओळख करून देतो.