सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुत्रा, मांजराचे मजेशीर व्हिडीओ तर कधी सापाचे भयावह व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी चीन आणि इंग्लडमधील माणसारखा दोन पायांवर उभा राहू शकणाऱ्या अस्वलाचा व्हिडीओ चर्चेत आला होता . काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात तर काही मनाला भावणारे असतात. सध्या काही पेंग्निनचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल होते आहे.
पेंग्विनचा गोंडस व्हिडीओ पाहिला का?
या व्हिडीओमध्ये रंगीबेरंगी बॅग पाठीवर घेऊन काही गोंडस पेंग्विन छोटी छोटी पावले टाकत जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि अनेकांना तो प्रंचड आवडला आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. काही लोकांनी शेअर केले की, छोटीशी बॅग पाठीवर घेऊन जाणारे पेंग्विन ही त्यांनी दिवसभरात पाहिलेली सर्वात गोंडस गोष्ट असल्याचे सांगितले तर काहींनी त्या छोट्या बॅगमध्ये काय असू शकते याचा अंदाज घेतला.
हेहे वाचा चीननंतर आता इंग्लंडच्या प्राणीसंग्रहालयात दिसले माणसासारखे दोन पायांवर उभे राहणारे अस्वल, शेअर केला व्हिडीओ
@buitengebieden या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “पेंग्विन सहलीला जात आहेत.” व्हिडीओमध्ये पेंग्विनचे लहान-लहान पावले टाकतानाचे दृश्य आहे, प्रत्येकजण त्यांच्या पाठीवर रंगीबेरंगी बॅग दिसत आहे. ५ ऑगस्ट रोजी शेअर केल्यापासून, व्हिडीओला १६.२ दशलक्ष पेक्षा जास्तवेळा पाहिले आहे आणि ही संख्या अजूनही वाढत आहेी
हेही वाचा – गुलकंद पान खायला आवडते का? पण गुलकंद कसे तयार होते माहितीये का? पाहा Viral video
या गोंडस व्हिडीओला लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली
एका ट्विटर यूजरने सांगितले, “आता हा एक विलक्षण व्हिडीओ आहे!”
“मला माहित नाही की ते कोठे जात आहेत, परंतु मलाही जायचे आहे,” दुसर्याने म्हटले.
तिसर्याने व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिली “ किती गोंडस!”
“ज्या प्रकारे पेंग्विन चालतात ते पाहणे कायम मनोरंजक असेल,” अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली. पाचवा म्हणाला, “मला आता एक (पेंग्विन) हवे आहे.”
“या बॅकपॅकमध्ये काय आहे हे मी विचार करत आहे. मासे?” असे आणखी एकाने सांगितले.
पाठीवर छोटीशी बॅग घेऊन जाणाऱ्या पेंग्विनचा व्हिडीओ तुम्हाला आवडला का?