जंगलातून प्रवास करताना किंवा रस्त्याच्या आजूबाजूला दाट झाडी असलेल्या परिसरात अनेकदा वाहनं सावधपणे चालवा असे सांगितले जाते. पण आता मुंबईच्या रस्त्यांवरुनही गाडी चालवतानाही गाडी सावकाश चालवा असे असे सांगण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईच्या रहदारीच्या रस्त्यावर चक्क एक कोल्हे धावताना दिसतोय. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय.

@dogownerstrainer नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल होतेय. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुण मित्रांसह रस्त्याने बाइकवरुन जात असतो. यावेळी बाइकने काही अंतर पुढे जाताच त्याच्या गाडीसमोर आधी एक कुत्रा पळत जातो, तर पुढे चक्क एक कोल्हा पळत येताना दिसतोय. हा कोल्हा रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळत जाताना दिसतोय. यावेळी बाइकवरील तरुण जोरजोरात कोल्हा, कोल्हा करुन ओरडताना दिसताय. हा व्हिडीओ मुलुंड पूर्वेकडील असल्याचे सांगण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High alert fox spotted at mulund east mumbai video viral sjr
First published on: 21-03-2024 at 00:45 IST