आपल्याकडे इंटरनेट स्पीडवरून दररोज काहींना काही तक्रारी समोर येत असतात. परंतु आता इतर ग्रहांवरही इंटरनेट सुविधा पोहचवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की ते पुढील २ वर्षांच्या आत चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहचवेल. म्हणजेच ही कंपनी चंद्रावर हाय-स्पीड इंस्टारनेट सुविधा पुरवणार असल्याचा दावा करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅक्वेरिअन स्पेस नावाची या कंपनीने सांगितले की ते केवळ २ वर्षात चंद्रावर वायफाय आणतील आणि त्यानंतर मंगळावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे पुढील लक्ष्य असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीला आतापर्यंत ६५०,००० डॉलर म्हणजेच भारतीय चालनानुसार सुमारे ५० दशलक्ष रुपये निधी मिळाला आहे.

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

अ‍ॅक्वेरिअन स्पेसला या प्रोजेक्टसाठी कॅलिफोर्नियाच्या ड्रेपर असोसिएट्स कडून निधी मिळाला आहे. कंपनीचे सीईओ कॅली लार्सेन यांनी सांगितलं की २०२१ पर्यंत चंद्राच्या आजूबाजूला १३ लँडर्स, ऑरबिट्स आणि रोव्हर्स होते. २०३० पर्यंत यांची संख्या २०० होण्याची शक्यता आहे. यामुळे एक अब्ज-ट्रिलियन लूनर अर्थव्यवस्थेची निर्मिती होईल, परंतु यासाठी मजबूत कम्युनिकेशन आवश्यक आहे, जो सोलनेटद्वारे उपलब्ध होईल. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील उपग्रह नेटवर्क १०० मेगाबाइट/सेकंद वेगाने धावेल, असा कंपनीचा दावा आहे.

२०२४ नंतर २०२५ मध्ये सोलनेट उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठेवण्याची कंपनीची तयारी आहे. नासाच्या कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिस प्रोग्राम अंतर्गत या प्रकल्पाचा तांत्रिक आढावा घेतला जात आहे. एरोनॉटिकल स्टार्ट-अप अ‍ॅक्वेरियन स्पेसच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे अंतराळ यानामध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही. हायस्पीड इंटरनेटशिवाय अवकाशातील हवामानाची माहिती सोलनेटच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहे. यासोबतच चंद्र आणि मंगळाची शास्त्रीय माहितीही गोळा केली जाणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High speed internet will now be available on the moon preparations for wifi delivery 2024 pvp
First published on: 24-03-2022 at 15:23 IST