चीनमध्ये सध्या शिक्षण व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कारण आहे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांबाबत पारित केलेला नवा प्रस्ताव. यामध्ये विद्यार्थ्यांच्या होमवर्कपेक्षा झोपण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवा नियम लागू होत आहे.

चीनमध्ये शिक्षण विभागाने एक प्रस्ताव पारित केला असून त्याअंतर्गत प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना रात्री 10 च्या आत झोपवणे अनिवार्य असेल. नव्या नियमांनुसार, येथे शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असो अथवा नसो, रात्री 10 च्या आत मुलांना झोपवणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय पालकांना आठवड्याच्या शेवटी मुलांसाठी ट्यूटर( खासगी शिक्षक) ठेवण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तर, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रात्री 9 च्या आत झोपणे गरजेचे असणार आहे. आठवड्याच्या शेवटी व सुट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगू नये, असा हा नियम आहे.

आणखी वाचा- चोर रेल्वेनं पळाला, पोलिसांनी विमानाने पाठलाग केला; अजब अटकेची गजब कहाणी

चीनच्या झेजियांग प्रांतात हा प्रचंड चर्चेचा विषय ठरला असून हे नियम म्हणजे होमवर्क कर्फ्यू असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून येत आहेत. पालकांमध्ये या नियमांप्रती राग असून यामुळे मुलं मागे पडतील असं त्यांचं म्हणणं आहे. पुर्व झेजियांग प्रातांतील शिक्षण विभागाने असे 33 नियम प्रकाशित केले आहेत. नियमांनुसार, शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असो अथवा नसो, 10 च्या आत त्यांना झोपवणे गरजेचे आहे.

सर्वत्र पालक आपल्या मुलांवर अभ्यासासाठी, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी चांगले मार्क्स मिळवण्याचा दबाव शाळेपासूनच टाकत असतात. त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला आहे.