Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्टेल सोडताना विद्यार्थीनीना अश्रु अनावर आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. विद्यार्थीनी एकमेकींना मिठी मारून रडल्या. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शाळा असो किंवा कॉलेजच्या आठवणी नेहमी मनाच्या कोपऱ्यात जीवंत असतात. हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो काळ खूप आठवणींनी भरलेला असतो. असाच हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थीनींचा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे हॉस्टेलचे दिवस आठवतील. घरापासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये अनेक जीवाला जीव देणारे मित्र मैत्रीणी भेटतात जे एकमेकांची काळजी घेतात. गुण्यागोविंदाने राहतात पण जेव्हा हॉस्टेल सोडायची वेळ येते तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही रडू येईल.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
A student tried to cheat by bribing teacher shocking video goes viral
बापरे! पास होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लपून ठेवले २०० रुपये, शिक्षकांना दिसताच…; VIDEO व्हायरल
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये मुली रडताना दिसत आहे. काही गळाभेट करत रडताना दिसताहेत. एकमेकींना निरोप देताना दिसत आहे. काही फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका हॉस्टेलवरचा आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या मित्र मैत्रीणींची आठवण येईल.
bhanaakohrani_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सर्वात कठीण गुड बाय”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावूक झाले तर काहींना त्यांचे हॉस्टेल किंवा कॉलेजचे दिवस आठवले. एका युजरने लिहिलेय, “तुम्हाला एकमेकींना गुडबाय करण्याची संधी मिळाली आम्हाला तर कोरोनाने गुडबाय करण्याची संधी सुद्धा दिली नाही. खरंच खूप वाटतं जेव्हा आपल्याला कळतं की हे मित्र मैत्रीणी पुन्हा कधीच भेटणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “उफ.. हा खरंच खूप कठीण गुडबाय आहे. तुम्हाला एकेमेकींची खरंच आठवण येईल पण आठवणी नेहमी कायम जीवंच राहील. सर्वांना शुभेच्छा” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून रडायला आले” काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही लोकांच्या त्यांच्या मित्र मैत्रीणींना टॅग केले आहेत.