“खबडक खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करतयं कोण, आजी आजोबा मावश्या दोन” ही बाल कविता आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकली असेल किंवा एखाद्या लहान बाळाला ऐकवली असेल. एखाद्या घरात लहान बाळ असेल तर त्यांच्याकडे विविध प्रकारची खेळणी असतातच. बाळाने पहिलं पाऊल टाकले नाही तोच त्याला चालण्यासाठी बाबागाडी आणतात. बाळ तोल सावरतं उभे राहत नाही तोच त्याच्यासाठी डुलाणारा घोडा आणतात. आता बाजारात चाक असलेला घोडाही मिळतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हा डुलाणारा घोडा किंवा चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर udyogam_ नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चाक असलेला प्लास्टिकचा घोडा तयार केला जातो हे दिसत आहे. व्हिडीओ खेळण्याच्या फॅक्टरीतील आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एका मशिनमध्ये वितळलेले प्लास्टिक चाकून त्यावर खूप दाब टाकला जातो त्यानंतर हवा तो आकार त्या प्लास्टिकला देण्यात येतो. प्लास्टिकपासून घो्ड्याचा शरीराचा आकार आणि एका सायकल सीट सारखा आकार तयार केल्याचे दाखवले आहे. नको असलेला भाग काढून टाकून प्लॉास्टिकच्या घोड्याच्या पाठीवर खिळे टोकून सीट बसवतात. त्यानंतर त्याच्या त्याला हँडल आणि चाकही लावले जाते आणि मग खेळण्यातील चाक असलेला प्लास्टिकचा घोडा तयार होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना फॅकरीमधील व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा – चंद्रा गाण्यावर तरुणीने केला भन्नाट गरबा; व्हायरल डान्स व्हिडिओ एकदा पाहाच!
हेही वाचा – गॅसवर नव्हे कुकरच्या वाफेवर बनवली गरमा गरम कॉफी; विक्रेत्याचा हटके जुगाड, पाहा Viral Video
लहान मुलांना चाकाच्या घोड्यावर बसून खेळताना तुम्ही नेहमीच पाहिले असेल पण तो खेळण्यातील घोडा कसा तयार केला जातो किंवा त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे कदाचित पहिल्यांदा पाहिले असावे. व्हायरल व्हिडीओवर लोकांना आवडला असून लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.