आयुष्यात आपल्या कमाईचा एक तरी दागिना घडवला जातो. सासू आपल्या सुनेसाठी.. आई आपल्या मुलींसाठी आपले दागिने सर्रासपणे राखून ठेवते. सौंदर्याचा साज दागिना. गरिबीची लाज राखणारा दागिना…प्रत्येक भारतीयाला सोन्याच्या दागिन्यांची भलतील हौस…महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वांनाच सोन्याचे दागिने आकर्षित करतात. हे दागिने बनवणे ही सुद्धा एक कला आहे. पण सोन्याचे दागिने नेमके कसे बनवले जातात? असा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आलाच असेल. सध्याच याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तुमच्या मानेला शोभणारी सोन्याची चैन तुमच्यापर्यंत येईपर्यंत कशा कशा यंत्रांमधून प्रवास करते, याचा रोचक प्रवास दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सोन्याची चैन कशी तयार केली जातेय, हे दाखवण्यात आलंय.या सोन्याच्या चैनला अगदी पारंपारिकरित्या घडवलं जातं. सोन्याची चैन घडवण्याची ही प्रक्रिया पाहून प्रत्येक जण हैराण झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक व्यक्ती सोनं घेऊन तो वितळवतो, साचामध्ये टाकतो आणि त्यानंतर त्याला हतोडीने लांब करतो. वितळून तयार केलेल्या मिश्रणावर आणखी वेगवेगळ्या प्रक्रिया करत छोट्या गोल कड्यांच्या आकारात बनवले जातात. हे वेगवेगळे छोटे गोल कडे नंतर एकात एक घालून त्यांना पॉलिश केल्यानंतर सोन्याची चैन तयार झालेली पहायला मिळते. इतक्या मेहनतीनंतर हा पीस बाजारात विकला जातो. हे फारच मेहनतीचं आणि अवघड काम आहे हे यातून दिसून येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सीए होताच लेकानं वडिलांना दिलं सरप्राईज; VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@HowThingsWork_ नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २० मिलियन व्हियुज मिळाले आहेत तर, अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. सोन्याची चैन बनल्याची ही प्रक्रिया पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. असे व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि युजर्ना खूप आवडतात.