Delhi metro viral video: दिल्ली मेट्रोची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. कधी भांडणाचा व्हिडिओच्या संदर्भात, तर कधी बिकिनी गर्लसोबत तर कधी मेट्रोमध्ये चुंबन घेतलेल्या जोडप्याचा व्हिडिओ. प्रत्येक दिवशी दिल्ली मेट्रोतील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र आता दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ नाही तर एका तरुणाची अनोखी युक्ती चर्चेचा विषय ठरला आहे. हा तरुण ५० रुपयांच्या प्रवास केवळ १० रुपयात कसा करायचा याची अनोखी ट्रीक सांगतोय. ही युक्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

५० रुपयांचा प्रवास फक्त १० रुपयांत

एक व्हिडीओ पोस्ट करत या तरुणाने पैसे कसे वाचवाल याबद्दल सांगत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोला हानी पोहोचवण्यासाठी नसून एका सूचनेसाठी बनवण्यात आल्याचे या तरुणाने स्पष्ट केले आहे. यामध्ये तो सांगतोय की, जर तुम्ही दोन मित्र मेट्रोनं प्रवास करताय तर तुम्ही एकमेकांची तिकीट वापरून पैसे वाचवू शकता. एकूण १०० रुपये देण्याऐवजी दोघेही प्रवास करत, केवळ २० रुपये खर्च येईल आणि ८० टक्के पैसे तुम्ही वाचवू शकता.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – रेल्वेत पॉर्न व्हिडीओ पाहू नका; ‘या’ रेल्वे कंपनीची प्रवाशांना महत्त्वाची सूचना

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीत चर्चा रंगली आहे. या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या मजेशी प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने लिहिले, एवढं डोक जर युपीएससीमध्ये लावलं असतं तर आता आयएएस झाला असता.