scorecardresearch

अजगराशी पंगा! काही सेकंदातच तरुणाच्या गळ्याला घातला विळखा अन्…Video पाहून थरकाप उडेल

तरुणाने हात लावताच अजगर साप पिसळला अन् थेट गळ्याला विळखा घालून चावा घेतला, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Giant Python Attack Video
अजगराने तरुणावर केला हल्ला. (Image-Instagram)

Huge Python Attack Viral Video : सापांसोबत खेळ करुन इन्स्टाग्रामवर रील किंवा व्हिडीओ बनवण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चाहत्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी अनेक तरुण जीव धोक्यात टाकताना दिसत आहेत. कधी किंग कोब्रा, कधी मगर, तर कधी अजगरासारख्या खतरनाक सापाशी पंगा घेतल्याचे तरुणांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अशातच एखाद्या विषारी सापाने दंश केला, तर साप पकडणाऱ्या माणसाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. एका महाकाय अजगराला पकडणे तरुणाला खूप महागात पडल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

अजगरासारखा भयानक साप समोर दिसला की माणसांची पळापळ होते. पण या तरुणाने अजगराशीच पंगा घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अजगरासोबत खेळ करणे तरुणाच्या अंगलट आल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अजगराला हात लावल्यानंतर त्या सापाने थेट तरुणाच्या गळ्याला विळखा घालून हाताला चावा घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अजगर साप किती खतरनाक असतो हे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. द रियल टारझन नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर या अजगर सापाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करुन त्या तरुणाने कॅप्शनमध्ये या घटनेबद्दल माहिती दिली आहे.

नक्की वाचा – Viral Video : पर्यटक होते घाईत पण गेंड्यांनी केली हवा टाईट, जंगलात जीप झाली पलटी अन्…

इथे पाहा व्हिडीओ

अजगराचा व्हिडीओ शेअर करत तरुणाने कॅप्शनमध्ये म्हटलंय, ही सापाची चूक नाहीय. मी या सापाला सोडून द्यायला हवं होतं. अशाप्रकारचे साप गळ्याला मोठा विळखा घालतात. या सापांची पकड खूप मजबूत असते. तुमच्या छोट्याशा चुकीमूळं जीव धोक्यात येऊ शकतो. हा स्क्रब पायथॉन आहे. या सापांना हाताळताना काळजी घ्या. कारण हे साप कधीही हल्ला करु शकतात. सापांने माणसांवर हल्ला केल्यावर त्यांना दोष देणं चुकीचं ठरेल. कारण नेहमी माणसंच सापांच्या जवळ जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 12:04 IST
ताज्या बातम्या