डान्स हा प्रत्येकाला आनंद देतो मग तो एखाद्याला नाचता येत असो किंवा नसो. संगीताच्या तालावर थिरकारा प्रत्येक व्यक्ती काही क्षणासाठी आनंदी असतो. आज काल सोशल मीडियावर कित्येक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी एखाद्या डान्स अॅकडमीमधील डान्सर अफालतून डान्स करताना दिसतात, तर कधी स्नेहसमेलनात लहान मुलं थिरकराना दिसतात, तर कधी कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तरुण-तरुणी नाचताना दिसतात. आज काल कोणतेही लग्न देखील नाचल्याशिवाय पूर्ण होत नाही. हळद-मेहंदी नंतर संगीत हा कार्यक्रम ठरलेला असतो. लग्नामध्ये अनेकदा नववधू आणि नवरदेव नाचताना दिसतात तर कधी लग्नाच्या संगीतमध्ये नातेवाईक नाचताना दिसतात.

सध्या अशाच एका संगीतमधील एका नवरा-बायोकाचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे जो नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये नवरा बायको एका प्रसिद्ध मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहे.

\”प्रिये, जगू कशा तुझ्या वीना मी राणी गं” या मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला बायको हातात झाडू घेऊन नाचताना दिसत आहे, त्यानंतर तिचा नवरा एंट्री घेतो आणि दोघेही गाण्याच्या तालावर नाचू लागतात. नवरा बायकोचा हा अफलातून डान्सने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर nileshbathe93 आणि vrushalibathe28 पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी दोघांचेही तोंड भरून कौतुक केले.

एकाने कमेंट केली की,” एक नंबर”

दुसऱ्याने कमेंट केली, जितके जोड्या रील बनवतात त्यापैकी सर्वात एक नंबर जोडी आहे बेस्ट ऑफ लक”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्याने कमेंट केली,”फार सुंदर जोडी आणि डान्स सुद्धा अप्रतिम”